आष्टी (प्रतिनिधी)
स्वातंत्र्यपूर्व काळात महिला चूल आणि मूल या संकल्पनेत असताना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी पहिल्या मुख्याध्यापिका म्हणून स्त्री शिक्षणासाठी पुढाकार घेतला.
समाजाचा सामाजिक स्तर उंचावण्यासाठी शिक्षणाची गरज
असल्याचे ओळखून क्रांतीज्योती
सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली असे प्रतिपादन आदर्श शिक्षिका स्वाती गाडेकर व मुख्याध्यापिका सौ.सविता माने यांनी केले.
आष्टी शहरातील स्व.अनिलभैय्या निकाळजे नगरात महिला मंडळाच्यावतीने महान स्त्री समाज सुधारक,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने आष्टीत बालिका दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी त्या अध्यक्ष स्थानावरून बोलत होत्या.
सौ.गाडेकर व सौ.माने पुढे म्हणाल्या की,फुले दाम्पत्याने शिक्षणाचे महत्त्व समाजाला पटवून दिले.शिक्षणाचा प्रचार आणी प्रसार केला मात्र आज शिक्षण घेण्याचा हेतू बदलला आहे. शिक्षणाकडे फक्त नोकरी मिळवण्याचे साधन म्हणून पाहिले जात आहे हे चुकीचे आहे.शिक्षणातुन आदर्श माणुस घडला पाहिजे असे सांगत स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या म्हणून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेयांच्याकडे पाहिले जाते.त्याकाळात स्त्रियांना शिक्षण मिळणे दुरास्पत होते अशा काळात सावित्रीबाईंनी स्त्रियांना शिक्षणाची दारे खुले केली.त्यामुळे बदलत्या काळानुरुप स्त्रियांनी शिक्षण घेऊन आज विविध क्षेत्रात आपल्या कार्य कर्तुत्वाने भरारी घेतली आहे असे आदर्श शिक्षिका स्वाती गाडेकर व मुख्याध्यापिका सौ.सविता माने म्हणाल्या.यावेळी शिक्षिका सौ.बबिता बोडखे म्हणल्या की, महात्मा फुले चिकित्सक वृत्तीचे होते.त्यांनी इतिहासाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन निर्माण केला.त्याच्या खांद्याला खांदा देऊन सावित्रीबाई फुले लढल्या.क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंना अतिशय वाईट वागणूक सहन करावी लागली. फुले दाम्पत्याने विषमतावादी,वाईट रूढी,परंपरांना नष्ट करुन समतेच बीज रोवलं आहे.स्त्रियांच्या जीवनात नवी शिक्षणाच्या माध्यमातून क्रांती घडवण्याचे अमूल्य कार्य क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांनी केले.चूल आणि मुल या जुनाट विचारसरणीला तिलांजली देत समता आणि बंधुत्वाची नवी पहाट निर्माण करणाऱ्या सावित्रीबाई फुले या महिलांच्या शिक्षण क्षेत्रातील 'हिरकणी' होत्या! असा गौरव केला.यावेळी क-हेवाडी येथील हरिनारायण स्वामी विद्यालयाच्या


रोशनी सांगळे,प्रिती सांगळे,सिध्दी बन्सोडे,खुशी कोथंबीरे,अंकीता म्हस्के,भुमी वडमारे या विद्यार्थीनीसह शृंगेरी विद्यालायाच्या मुख्याध्यापिका सविता माने,सौ.आशा रासकर,सौ.स्वाती गाडेकर,सौ.आशा कोथंबीरे,सौ.स्वप्नाली दत्ता बोडखे,श्रीमती ढवळे मॕडम,वर्षा शिंदे,सौ.अश्विनी तांबे,सौ.पोर्णिमा निकाळजे यांची समयोजीत भाषणे झाले.यावेळी श्रीमती ढवळे
" गर्भातच अंत करु नका सावित्रीचा " ही कविता सादर करुन उपस्थितांचे मने जिंकले.यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी अत्यंत अभ्यासपूर्वक भाषणे करून उपस्थितांची वाहवा मिळवली.या शालेय विद्यार्थ्यांनीच्या भाषणाला भरभरून प्रतिसाद मिळाला.
पुढे बोलताना सौ.पोर्णिमा निकाळजे म्हणाल्या की,क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवन चरित्र कार्यातील स्त्रियांसाठी घेतलेले त्यांनी परिश्रम आणि त्यामुळे स्त्रियांच्या जीवनात आलेली सकारात्मक परिवर्तनाची क्रांती या अनुषंगाने विविध उदाहरणे देऊन मार्गदर्शन केले.या कार्यक्रमास आष्टी पंचायत समितीच्या माजी सदस्या सौ.प्रज्ञा निकाळजे,सौ.सांगीता शाहीर,सौ.नम्रता सोनवणे,सौ.वैशाली लोंढे,सौ.सुनिता सोनवणे,सौ.शितल निकाळजे,सौ.माधुरी वडमारे,सौ.मोनाली कदम,सौ.सुनिता जगताप,सौ.मनिषा सायंबर,सौ.पल्लवी संदीप चौधरी,सौ.अलका चौधरी,सौ.राजश्री गायकवाड,सौ.मंदाकिनी कांबळे,सौ.ज्योती धोंडे,सौ.सुनिता संपतराव धोंडे,सौ.राजेश्वरी धोंडे,सौ.ताराबाई एकनाथ धोंडे,सौ.पुनम धोंडे,जनाबाई धोंडे,सौ.लता खंडागळे,सौ.संगीता खंडागळे,नंदीनी निकाळजे,सोनवणेबाई आदि महिला,विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे नियोजन सौ.पोर्णिमा मिलींद निकाळजे,श्रीमती सविता ढवळे,सौ.बबीता बोडखे यांनी केले.कार्यक्रमचे संचलन सौ.बबीता बोडखे यांनी तरा उपस्थितांचे आभार सौ.पोर्णिमा निकाळजे यांनी मानले.
----------------------------
*चौकट*
--------
*सावित्रीच्या वेशातील
मुलींनी लक्ष वेधले!*
-------------------------------
सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने काही विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले यांचा जशास तसा वेश परिधान करून उपस्थितांचे लक्ष वेधले.
0 टिप्पण्या