आष्टी (प्रतिनिधी)
बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या झालेल्या निर्घृण हत्येच्या पार्श्वभूमीवर आ.सुरेश धस यांनी वाढदिवस साजरा करायचा नाही असे ठरविले आहे.केवळ येणाऱ्या प्रत्येकाशी ते भेटणार असून कुठल्याही प्रकारचे हार-तुरे,शाल,फेटे घेणार नाहीत.हा वाढदिवस अंत्यंत साध्या पद्धतीने तसेच शैक्षणिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेऊन शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी,स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी यासह वाचनालय यांना उपयुक्त अशी पुस्तके भेट म्हणून ते स्वीकारणार असल्याने त्यांच्या या वाढदिवसदिनी आपण ५५ हजारांची पुस्तके आ.सुरेश धस यांना भेट देणार असल्याचे आष्टीचे माजी नगराध्यक्ष रंगनाथ धोंडे यांनी दैनिक झुंजारनेताशी बोलताना सांगीताले.
पुढे बोलताना ते म्हणाले की,आष्टी मतदार संघाचे भाग्यविधाते दूरदृष्टी असणारे व्यक्तिमत्त्व,

गोरगरीब,दीन दुबळ्यांचे कैवारी आ.सुरेश अण्णा धस यांचा दि.२ फेब्रुवारीला वाढदिवस असतो.त्या वाढदिवसानिमित्त यंदा ५५ हजार रुपयांची पुस्तके भेट देऊन हा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे.त्यानंतर ही पुस्तके अण्णांच्या सूचनेनुसार गरजवंत विद्यार्थ्यांना वाटण्यात येणार असल्याचेही रंगनाथ धोंडे यांनी सांगीतले.
0 टिप्पण्या