आष्टी (प्रतिनिधी)
सन २०१६ - २०१७ साली भारत देशाला १९ लाख युनिट्स रक्ताचा तुटवडा भासला होता.सन २०१५ - २०१६ साली ही संख्या ११ लाखांवर होती.यावरुन किती मोठ्या प्रमाणावर रुग्णालयामध्ये रुग्णांना रक्ताची गरज आहे.हे लक्षात येते.आज रोजी प्रत्येकवर्षी भारतामध्ये ५ कोटी युनिट्स रक्ताची गरज भासते.या सर्व गोष्टीचा विचार केल्यास दररोज ३८ हजारहून अधिक रक्तदान शिबीरे आयोजित करायला हवीत म्हणून प्रजासत्ताक दिनानिमित्त आष्टी तहसिल कार्यालयाने रक्तदान शिबीराचे आयोजन केले आहे.प्रत्येक नागरिकाने या रक्तदान शिबीरामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन आष्टी तहसीलदार वैशाली पाटील यांनी केले आहे.
पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या की, सध्याच्या स्थितीत आपल्याला रक्त आणि रक्तदान शिबीराचे महत्व लक्षात येते.आपण केलेल्या रक्तदानामुळे अनेक गरजू रुग्णांचे जीवन वाचवीता येते.त्यामुळे रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असे नेहमी संबोधले जाते.दि.२६ जानेवारी या ७६ व्या.प्रजासत्ताक दिनानिमित्त तहसिल कार्यालय आष्टी येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन दि.२६ जानेवारी रोजी सकाळी ११ वा.आयोजित केले आहे.या रक्तदान शिबीरामध्ये आष्टी तालुक्यातील सर्व कार्यालय प्रमुख व अधिकारी कर्मचारी,सर्व सेतु सुविधा केंद्र चालक,महसूल प्रशासनातील ग्राम महसूल अधिकारी,मंडळ अधिकारी,

महसूल सहायक,सहायक महसूल अधिकारी,महसूल सेवक' व तालुक्यातील जनतेने सहभागी होऊन आपण स्वतःही रक्तदान करावे व आपले सोबत शक्य झाल्यास जास्तीत जास्त लोकांना सदर रक्तदान शिबीरामध्ये सहभाग नोंदवून रक्तदान करण्यास प्रोत्साहीत करावे असे आवाहन वैशाली पाटील तहसिलदार यांनी केले आहे.
0 टिप्पण्या