Ticker

6/recent/ticker-posts

पत्रकार उत्तमराव बोडखे यांची लेखनतील गुणवत्ता पत्रकारिता क्षेत्राची उंची वाढविणारी ............... ह.भ.प.बबन महाराज व तहसिलदार वैशाली पाटील यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान

आष्टी (प्रतिनिधी) जेष्ठ पत्रकार उत्तम बोडखे हे तीन दशकावून अधिक काळ सातत्याने पत्रकारितेत राहून सर्व विषयांना स्पर्श घेत बातमीतून योग्य दिशेचा वेध घेतात. त्यांची पत्रकारिता आणि लेखणी सबंध पत्रकारिता क्षेत्राची उंची वाढविणारी आहे अशा शब्दात ज्येष्ठ कीर्तनकार तथा ह.भ.प.बबन महाराज बहिरवाल यांनी गौरव केला. आष्टीचे ज्येष्ठ पत्रकार तथा दैनिक झुंजारनेताचे उपसंपादक उत्तम बोडखे यांना संत मदन महाराज बिहाणी देवस्थानचे अध्यक्ष ह.भ.प.बबन महाराज बहिरवाल आणि आष्टीच्या तहसिलदार पाटील यांच्या हस्ते मानाचा आणि प्रतिष्ठेचा समाजसेवक स्व.शेख मैनोद्दीन स्मृती आदर्श पत्रकार पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला.याबद्दल त्यांचा देवस्थानच्या वतीने ह.भ.प.बबन बहिरवाळ तसेच तहसीलदार वैशाली पाटील यांच्या वतीने शाल श्रीफळ देऊन येत होती सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.कडा येथील सद्गुरु सभागृह येथे आयोजित करण्यात आलेल्या या शानदार कार्यक्रमास हरिभाऊ जंजीरे,शेख ईमामभाई,प्रा.डाँ.जमीर शेख,समीर शेख,भाऊसाहेब भोजने यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आवर्जून उपस्थित होते.आष्टीचे ज्येष्ठ पत्रकार उत्तम बोडखे हे गेल्या ३५ वर्षांपासून वृत्तपत्र क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी आतापर्यंत दैनिक लोकमत,दैनिक आनंद नगरी,दैनिक एकमत आदी नामांकित दैनिकांचे आष्टी तालुका प्रतिनिधी म्हणून काम केलेले आहे.सध्या ते बीड जिल्ह्यातील नामांकीत दैनिक झुंजारनेताचे उपसंपादक म्हणून कार्यरत आहेत तर मराठवाड्यातील लोकप्रिय दैनिक लोकमतचे सलग २५ वर्षे आष्टी तालुका प्रतिनिधी म्हणूनही काम केलेले आहे.बीड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्षपदाची धुराही त्यांनी यशस्वीपणे सांभाळलेली आहे. पत्रकारितेबरोबरच विविध सामाजिक कार्यात त्यांचा नेहमी सहभाग असतो.बोडखे यांना आजपर्यत ७० ते ८० विविध पुरस्कार मिलालेले आहेत.उत्तम बोडखे दर्पण पुरस्कारप्राप्त पत्रकार असून त्यांना २५ वर्षापासुन महाराष्ट्र शासनाची अधिस्विकृती पत्रिका आहे.निर्भिड व परखड पत्रकारितेचा ते वारसा यशस्वीपणे पुढे चालवीत आहेत.वृत्तपत्र क्षेत्रातील त्यांच्या ३५ वर्षांच्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र सरकारने शासकीय पत्रकार म्हणुन मान्यता दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या