Ticker

6/recent/ticker-posts

विद्यार्थ्यांनी अभ्यास करुन करिअर घडवावे ........ डॉ.महेश नाथ

आष्टी (प्रतिनिधी) आपल्या करिअरमध्ये योग्य तो समतोल कसा साधावा असे मार्गदर्शन करत. करिअरची निवड करताना कशा पद्धतीने विचार केला पाहिजे. अभ्यास किंवा काम करताना योग्य नियोजनाचे महत्त्व आहे.विद्यार्थ्यांनी अभ्यास करुन करिअर घडवावे असे प्रतिपादन डाँ.महेश नाथ यांनी केले. दि.२० जानेवारी रोजी भास्कर अकॅडमी फॉर सायन्स अँड इंजीनियरिंग संचलित अविष्कार लर्निंग सेंटर आणि राख करिअर सेंटरच्यावतीने १२ वी.बॅचचा शुभेच्छा समारंभ संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कड्यातील प्रसिद्ध दंतरोग चिकित्सक डॉ.महेश नाथ हे होते.उद्घाटन जामखेडचे प्राचार्य पंकज शिंदे यांनी केले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन महाराष्ट्र बळीराजा अधिकार परिषद पुणेच्या सचिव सीमा गुट्टे मॅडम, आष्टीच्या अँड.प्रतीक्षा डावकर,राजस्थानचे फिजिक्स ट्यूटर प्रा.अविनाश कुमार झा हे उपस्थित होते.कार्यक्रमात सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन केले.अध्यक्षीय भाषणात डॉ.महेश नाथ यांनी विद्यार्थ्यांना याप्रसंगी सीमा गुट्टे मॅडम यांनी आजच्या काळात विद्यार्थ्यांचा वाढता मोबाईल वापर आणि त्यातून होणाऱ्या सवयींमुळे आरोग्यावर होणारे विपरित परिणाम स्पष्ट केले.त्यांनी विद्यार्थ्यांनी मोबाईल पासून लांब राहून आपले करिअरवर अधिक फोकस कसा करावा, यावरही विचार मांडले.
अँड.प्रतीक्षा डावकर मॅडम यांनी विद्यार्थ्यांना आजकाल घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांबाबत जागरूक करत,त्यापासून कसे दूर राहावे याविषयी मार्गदर्शन केले. प्रा.अविनाश कुमार झा यांनी आयआयटी प्रवेशाच्या तयारीसाठी राजस्थानमधील कोटा शहर कसे महत्त्वपूर्ण ठिकाण आहे.याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे आयोजन सौ.मीरा शिवाजी राख आणि सौ.माधुरी महेश तवले यांनी केले.आष्टी येथील गणेश मंगल कार्यालयात या समारंभाचा आयोजन करण्यात आला होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या