Ticker

6/recent/ticker-posts

आष्टी येथील सियाज् प्रि-स्कूलमध्ये मातापालक मेळावा,हळदी-कुंकू कार्यक्रम संपन्न

आष्टी(प्रतिनिधी) आष्टी शहरातील सियाज्- प्रि स्कूलमध्ये महिलांसाठी नुकताच माता पालक मेळावा व पारंपरिक हळदी-कुंकू सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. महिलांनी पारंपरिक पोशाख परिधान करून कार्यक्रमाला हजेरी लावली,त्यामुळे कार्यक्रमाचे आकर्षण अधिक वाढले.कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने व मंगल आरतीने करण्यात आली.यानंतर उपस्थित महिलांनी एकमेकींना हळदी-कुंकवाचा सन्मान देत उखाणे घेतले.शाळेने सर्व महिलांना वान दिले.हळदी-कुंकू समारंभानंतर पालकांनी शाळेबद्दल आपल्या प्रतिक्रिया ,भावना व्यक्त केल्या.अल्पावधीत सियाज् प्रि स्कूल शाळेत विद्यार्थ्यांची अनपेक्षित प्रगती होत आहे.आष्टी शहरातील ही एकमेव अशी शाळा आहे की, जी अभ्यासासोबत पारंपरिक कार्यक्रम आयोजित करून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करते.या शाळेत आमचे विद्यार्थी येत असल्यापासून प्रत्येक सणाचे महत्त्व घरी येऊन आम्हाला सांगत आहेत.हे सर्व फक्त सियाज् प्रि स्कूल शाळेमुळे शक्य होत आहे.माता पालकांच्या मनोगतानंतर शाळेच्या संचालिका प्रा.इंजी.सौ.प्रियंका सचिन विधाते यांनी हा कार्यक्रम शाळेने आयोजित करण्याचा उद्देश सांगत शाळेचे ब्रीद वाक्य संस्कार हीच साधना त्याला अनुसरून प्रत्येक महिला आज सर्व भूमिका पार पाडत असताना जसे आई, आजी,बहीण, मार्गदर्शिका स्वतःला वेळ देत नाहीत.या धावपळीतून स्वतःसाठी एक दिवस देतील.आपली संस्कृती आहे ती आपल्या विद्यार्थ्यांना समजेल व विद्यार्थी आपल्या पुढील पिढीपर्यंत घेऊन जातील. कार्यक्रमांमुळे महिला एकत्र येऊन स्नेहभाव वाढवतील.पारंपरिक मूल्ये जपण्याचा आणि साजरी करण्याचा हा आमचा प्रयत्न आहे.माता पालकांच्या मनोरंजनासाठी शाळेने होम मिनिस्टर कार्यक्रम केला.यामध्ये काही खेळ घेण्यात आले. त्या खेळातून प्रथम क्रमांक सरस्वती धोंडे,द्वितीय क्रमांक रूपाली धोंडे,तृतीय क्रमांक सोनाली सानप यांचा आला. त्यांना शाळेतर्फे बक्षीसही देण्यात आले. या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सर्व महिलांनी कार्यक्रमाचे कौतुक केले. पुढील वर्षीही अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्याची विनंती केली. हा कार्यक्रम शाळेच्या शिक्षिका सौ. सुनीता अनारसे,सौ.रुपाली धोंडे, सौ.मोनाली शिंदे सौ.पुनम गायकवाड , सौ.भाग्यश्री देशमुख, सौ.ज्योती मुळे,स्वाती तवले,आरती द्वारके तसेच मदतनीस सुरेखा जाधव यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या शेवटी शाळेचे संचालक प्रा.इंजि.सचिन विधाते यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या