शासनाच्या योजनेतून व्यवसाय सुरु करण्याची संधी मिळाली तिचे सोने करा ----- माजी आ.साहेबराव दरेकर ............... आष्टीत ॲग्री क्लिनिक ॲग्री बिजनेस कोर्स च्या दहाव्या बॅचचा शुभारंभ
आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी तालुक्यातच नव्हे तर मराठवाड्यात जयदत्त शिक्षण कृषी जलविकास प्रतिष्ठान या संस्थेचा नाव लोकिक आहे पाणलोट क्षेत्र विकास आणि ग्रामीण भागात लघु उद्योग करण्याचे अनेक प्रशिक्षण या संस्थेच्या माध्यमातून झाले आहेत कृषी मंत्रालय भारत सरकार आणि नाबार्डच्या माध्यमातून ॲग्री क्लिनिक ॲग्री बिजनेस कोर्सच्या माध्यमातून ग्रामीण भागातील कृषी क्षेत्राशी निगडित शिक्षण झालेल्या विध्यार्थ्यांना शासनाच्या योजनेमधून आर्थिक मदत घेऊन उद्योजक बनता येईल शेतकऱ्यांच्या मुलांसाठी हे अत्यंत चांगले आहे विद्यार्थ्यांनी जिद्द चिकाटी वेळेचा उपयोग करून आपला उद्योग यशस्वी केला पाहिजे असे मत माजी आ. साहेबराव दरेकर यांनी जयदत्त शिक्षण कृषी जलविकास प्रतिष्ठान मध्ये ॲग्री क्लिनिक ॲग्री बिजनेस कोर्सच्या दहाव्या बॅचच्या शुभारंभ प्रसंगी व्यक्त केले.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार उत्तम बोडखे हे होते ते म्हणाले की,अत्यंत चांगली संधी विद्यार्थ्यांना या कोर्सच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे. या योजनेच्या माध्यमातून आपण आपले जीवन बदलण्यासाठी प्रयत्न करावेत ग्रामीण भागाचा चेहरा मोहरा बदलायचा असेल तर शासनाने उपलब्ध करून दिलेल्या संधीचे सोने करावे याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष तथा सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे यांनी संस्थेच्या कार्याविषयी माहिती देत या कोर्सच्या माध्यमातून आपण उद्योजक होणार आहात पण प्रामाणिक पणा आपल्या असू द्या असे म्हटले.
याप्रसंगी संस्थेचे नोडल ऑफिसर विठ्ठलराव गुंजाळ,पत्रकार संतोष सानप,मुजाहिद पठाण संस्थेच्या कोऑर्डिनेटर विद्या पोकळे यांच्यासह कर्मचारी वर्ग उपस्थित होता.
0 टिप्पण्या