Ticker

6/recent/ticker-posts

आष्टीच्या गंगाई -बाबाजी महोत्सवातील आदर्श पुरस्कार वितरणासाठी अभिनेत्री कल्याणी चौधरी येणार!*

आष्टी (प्रतिनिधी) आष्टी तालुक्यातील शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष माजी आ.भीमराव धोंडे यांचे माता-पिता स्मृतिप्रीत्यर्थ आष्टी येथील भगवान महाविद्यालय मैदानावर गंगाई -बाबाजी महोत्सव २०२५ भगवान महाविद्यालयाच्या भव्य आवारात दि.३० जानेवारी ते १ फेब्रुवारी या तीन दिवशीय होणार असून या महोत्सवात विविध सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक कार्यक्रमांची रेलचेल होणार असून आष्टीत अक्षरशः महाविद्यालयीन युवकांच्या कलागुणांचा सुंदर महोत्सव मंचावर रंगणार आहे, यासाठी उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकाच्या वतीने करण्यात आले आहे. आष्टीत गंगाई बाबाजी महोत्सवाची गेल्या अनेक वर्षाची परंपरा आहे.या महोत्सवातून विशेषतः विद्यार्थी आणि युवा वर्गाला शिक्षणाच्या माध्यमातून आणि कलागुणांना विकसित करण्याच्या दृष्टिकोनातून व्यापक संधी दिली जाते.त्याच समवेत राज्यभरातील विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम करत असलेल्यांना शाब्बासकीची थाप म्हणून गंगाई बाबाजी राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविले जाते.या अनुषंगाने हा महोत्सव राज्य भरातील गुनणीजणांसाठी पर्वणी असतो.यंदाच्या महोत्सवाचे उद्घाटन दि.३० जानेवारी २०२५ रोजी सकाळी १० वा.माजी मंत्री प्रा.सुरेश नवले यांच्या हस्ते होणार आहे.तर या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे अध्यक्ष माजी आ.भीमराव धोंडे हे भुषविणार आहेत.या महोत्सवातील सर्व स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांचा लाभ आष्टीकरांनी घ्यावा असे आवाहन प्राचार्य डाॕ.दत्तात्रय वाघ यांनी केले आहे. उद्घाटन सोहळ्यानंतर दुपारी १२ वा.वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.या महोत्सवात शेतकऱ्यांच्या मुलांचे लांबलेले विवाह एक सामाजिक समस्या,नितीमुल्यांचा वाढता -हास आणि सामाजिक जीवन हे तीन विषय स्पर्धेसाठी आहेत.महाविद्यालयीन स्नेहसंमेलन आणि वार्षिक स्नेहसंमेलन होणार आहे.दि.३० जानेवारी २०२५ रोजी काव्यवाचन स्पर्धा,वक्तृव स्पर्धा तर दि.३१ जानेवारी रोजी संस्थेतील शाळा, महाविद्यालयाचे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.दि.१ फेब्रुवारी रोजी सकाळचे सत्रात मान्यवरांच्या हस्ते " गंगाई -
बाबाजी राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार वितरण " दुपारचे सत्रात सायंकाळी ४ खुल्या लावणी स्पर्धा होणार आहेत.दि.१ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी बक्षीस वितरण " गंगाई- बाबाजी राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार " वितरण सोहळा होणार आहे.या सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती ना.प्रा.राम शिंदे आणि " लागीरं झालं जी " या मालीकेतील शितलची मामी अभिनेत्री कल्याणी चौधरी यांंच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी आ.भीमराव धोंडे राहणार असुन प्रमुख उपस्थिती युवानेते डाॕ.अजयदादा धोंडे यांची लाभणार आहे.प्रत्येक स्पर्धेचे बक्षीस वितरण स्पर्धा संपताच केले जाईल.महोत्सव यशस्वी होण्यासाठी भगवान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.दत्तात्रय वाघ,उपप्राचार्य डाॕ.ज्ञानदेव वैद्य,उपप्राचार्य डाॕ.आप्पासाहेब टाळके,उपप्राचार्य सुनिल भवर,प्रा.डॉ.बाळासाहेब गावडे,प्रा.डॉ. आबासाहेब पोकळे,प्रा.डाॕ.वंदना घोडके यांच्यासह सर्व प्राध्यापक आणि संयोजक समिती परिश्रम घेत आहेत. चौकट -------- दि.३० जानेवारी -------------- माजी मंत्री प्रा.सुरेश नवले यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होईल; तर अध्यक्षस्थानी माजी आमदार भीमराव धोंडे असतील.तसेच दुपारी बारा वाजता वक्तृत्व स्पर्धा आणि वार्षिक स्नेहसंमेलन पार पडेल. दि.३१ जानेवारी ------------- शुक्रवारी सकाळी १० वाजल्यापासून संस्थेतील विविध शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून या मंचावर सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असेल. दि.१ फेब्रुवारी --------------- शनिवारी सकाळी गंगाई- बाबाजी राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार वितरण महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री कल्याणी चौधरी यांच्या हस्ते प्रदान येईल; तर दुपारच्या सत्रात खुल्या लावणी स्पर्धा रसिक प्रेक्षकांच्या आनंदात भर घालतील. ********************

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या