Ticker

6/recent/ticker-posts

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा उद्घाटन संपन्न ..................... मराठी भाषा अभ्यासकांनी साहित्य व संस्कृती संशोधनसाठी पुढाकार घ्यावा ................. तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे

आष्टी (प्रतिनिधी) मराठी भाषा ज्ञानभाषा आहे.मध्ययुगीन कालखंडात संत ज्ञानेश्वर,तुकारामा आदी संतानी सर्वश्रेष्ठ वाड्'मयाची निर्मिती केली.मराठी भाषेचे उपयोजन शासकीय सर्व कार्यालयातून होत आहे.भविष्यात निश्चितच मराठी भाषा ही विज्ञानाची भाषा होणार आहे.कृषी संस्कृतीत मोठ्या प्रमाणात बदल झाले आहेत. परपांरिक शेती करण्याची पध्दत बंद झाली.शेतीमध्ये यांत्रिकीकरण मोठ्या प्रमाणावर आल्यामुळे मराठी भाषेतील अनेक पद लोप पावत आहेत.मराठी भाषा अभ्यासकांनी मराठी साहित्य व संस्कृती संशोधनसाठी पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन आष्टीचे तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे यांनी केले. आष्टी तालीक्यातील कडा येथील आनंदराव धोंडे ऊर्फ बाबाजी महाविद्यालयामध्ये मराठी विभाग आयोजित मराठी भाषासंवर्धन पंधरवडा उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रोफेसर डॉ.भास्कर चव्हाण हे होते तर उद्घाटक म्हणून तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे,बालविकास व प्रकल्प अधिकारी जयश्री बेल्हेश्वर हे उपस्थित होते.कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित पाहुण्यांच्या स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्यक्त करताना मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.जी.पी.बोडखे म्हणाले की,१४ ते २८ जानेवारी दरम्यान मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात येतो.याबाबात सविस्तर माहिती दिली.मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. मराठी भाषा विद्यापीठ अमरावती जिल्ह्यात रिद्धपूरमध्ये सुरू झालेले आहे.मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्यामुळे देशातील साडेचारशे विद्यापीठातून मराठी भाषा शिकवली जाणार आहे.केंद्र शासनाकडून मराठी भाषा संशोधन कार्यासाठी अनुदान मिळणार आहे. ही एक मराठी भाषेच्या दृष्टीने चांगली बाब आहे.मराठी भाषेतील जागले कधी मराठी भाषा संपवू देणार नाहीत.मराठी भाषेला साहित्य संस्कृती व वाड्'मयाची समृद्ध परंपरा लाभलेली आहे.त्यामुळे उत्तरोतर मराठीचा विकासास होत जाईल.कार्यक्रमाचे उद्घाटक तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे म्हणाले की,मराठी भाषा ज्ञानभाषा आहे. मध्ययुगीन कालखंडात संत ज्ञानेश्वर,तुकारामा आदी संतानी सर्वश्रेष्ठ वाड्'मयाची निर्मिती केली.मराठी भाषेचे उपयोजन शासकीय सर्व कार्यालयातून होत आहे.भविष्यात निश्चितच मराठी भाषा ही विज्ञानाची भाषा होणार आहे.कृषी संस्कृतीत मोठ्या प्रमाणात बदल झाले आहेत,परपांरिक शेती करण्याची पध्दत बंद झाली.शेतीमध्ये यांत्रिकीकरण मोठ्या प्रमाणावर आल्यामुळे मराठी भाषेतील अनेक पद लोप पावत आहेत.बैलगाडी वापर कमी झाला तर त्या संदर्भातील अनेक शब्दाचा लोप होऊ शकतो.ग्रामीण शेतीसंबंधी अनेक मराठी शब्द लोप होण्याच्या मार्गावर आहेत.भाषा ही परिवर्तनशील असते.भाषेचे लवचिक धोरण असते,त्यामुळे मराठीत अनेक नवीन शब्द रूढ होत आहेत.मराठी भाषा अभ्यासकांनी मराठी साहित्य व संस्कृती संशोधनसाठी पुढाकार घेणे गरजेचे आसल्याचे सांगीतले.यावेळी प्रमुख अतिथी श्रीमती जयश्री बेल्हेकर यांनी म्हणाल्या की,मराठी भाषा संवर्धन करण्याची गरज असेल तर आपण सर्वांनी मराठी भाषेतूनच बोलण्याचा आग्रह केला पाहिजे. आपोआपच मराठीचे संवर्धन होईल.इतर भाषेतील ज्या ज्ञान परंपरा आहेत त्या मराठी भाषेत कशाप्रकारे येतील याविषयी विचारमंथन होणे गरजेचे आहे. बाराव्या शतकाच्या अगोदर महानुभाव पंथायांनी मराठी भाषेचा आग्रह केला.आजही मराठी भाषेमध्ये उत्कृष्ट साहित्य निर्माण होत आहे.ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यकृती मराठीत निर्माण झाल्या आहेत.उत्तरोत्तर मराठी भाषा अधिक समृद्ध होईल,याबाबत शंका घेण्याचे कारण नाही.अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना उपप्राचार्य प्रोफेसभास्कर स् चव्हाण यांनी म्हटले की, आजही यूपीएससी व एमपीएससी परीक्षेमधील यशस्वी विद्यार्थीनी मातृभाषेतूनच शिक्षण घेऊन स्पर्धा परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण झाले आहेत.त्यामुळे मराठी भाषेला कमी समजण्याचे कारण नाही. भाषा व संस्कृतीचा अतुट संबंध असतो.मराठी संस्कृतीचे जतन झाले की,आपोआप मराठी भाषेचे संवर्धन होणार आहे. मराठीत अनेक बोली भाषा बोलल्या जातात,बोलीतून साहित्य निर्माण होत आहे.खेड्यातील अनेक लोक चागल्या पध्दतीने मराठी भाषा बोलतात,त्यामुळे प्रमाणभाषा व बोली भाषा या दोन्ही बाबत अधिकचे संशोधन होणे गरजेचे आहे.व्यासपीठावर आजीवन शिक्षण आणि विस्तार विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ.श्याम सांगळे,यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे केंद्र संयोजक प्रा.डॉ.ए.बी.माळशिखरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ.शैलेजा कुचेकर यांनी तर उपस्थितांचे आभार प्रा.डॉ.माळशिखरे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या