Ticker

6/recent/ticker-posts

चिखलीत अखंड हरिनाम सप्ताह सोहळा सुरु .................... गाथाभजन,ज्ञानेश्वरी पारायण, धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल .................... आज ह.भ.प.शिवाजी महाराज कोकणे यांचे हरिकीर्तन

आष्टी (प्रतिनिधी) आष्टी तालुक्यातील चिखली येथील अखंड हरिनाम सप्ताहामध्ये गुरुवार दि.१६ जानेवारी रोजी ह.भ.प.शिवाजी महाराज कोकणे यांचे कीर्तन होणार आहे.अत्यंत व्यस्तता असून देखील त्यांनी शिवाजी महाराज यांनी वेळात वेळ काढून चिखली येथील सेवेसाठी निश्चित केल्याबद्दल मनापासून आनंद होत आहे. सनातन धर्मामधील जाचक आणि क्लिष्ट संदर्भ अत्यंत सोपे करून सांगण्याचे ह.भ.प. शिवाजी महाराज कोकणे यांचे कौशल्य आहे.आष्टी तालुक्यातील चिखली (हनुमंतगांव) येथे सनातन,वैदिक परंपरेतील कठीण साधनेला सुलभ करून संतांनी कलीयुगातील सर्व सामान्य भाविकांच्या उद्धारासाठी सर्व समावेशक भागवत सांप्रदयाची उभारणी केली.या सुलभ साधनेतून समाज मनात सांप्रदयाविषयी प्रेमयुक्त आस्था निर्माण केली.किर्तन हे अत्मोधाराचे सुलभ साधन म्हणून सांप्रदायिक समाजाने अंगीकारलेली उपासना आहे.काळाच्या ओघात वारकरी सांप्रदयाचा आधार घेवून पंतोपंथ वेगळे अस्तित्व निर्माण करू पाहत आहेत अशा संक्रमण प्रसंगी महाराष्ट्रातील अनेक संत महंत सत्पुरुषांनी वारकरी संप्रदयाला सतत तेजोमय ठेवून समाजाला व्यसनमुक्ती आदर्श व्यवहार, समाजभिमूख सृजनशिलता,सोज्वळ व प्रांजळ उपासना मातृ-पितृ सेवा करण्यास प्रवृत केले.आष्टी तालुक्यातील चिखली येथे त्या तेजोमय व दिव्य परंपरेला स्मरुन ज्ञानेश्वरी पारायणानिमीत्त या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. संत परंपरेनुसार धार्मिक भावना निर्माण करण्याचे महान कार्य ह.भ.प.कोकणे महाराज करत आहेत.त्यांच्या कीर्तन सेवेमुळे चिखली येथील अखंड हरिनाम सप्ताह आणि ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे अशी भावना ग्रामस्थांनी यांनी व्यक्त केली आहे.या सप्ताहात काकडा भजन,विष्णु सहस्रनाम,ज्ञानेश्वरी पारायण,गाथा भजन, प्रवचन,हारिपाठ, हरिकीर्तन व हरिजागर आदि धार्मिक कार्यक्रम होत आहेत.या सप्ताहात शनिवारी नामधारक संत ह.भ.प. आसाराम महाराज केळसांगवीकर यांचा नमजप,रविवारी ह.भ.प.श्रीहरि पुरी महाराज,सोमवारी ह.भ.प.ओम महाराज नन्नवरे,मंगळवारी समाजसेवक बबनदादा शिंदे यांच्या कीर्तन सौजन्याने खानापूर येथीला ह.भ.प.वेदिका महाराज तावरे यांचे हरिकीर्तन झाले. बुधवारी ह.भ.प.अशोक महाराज झांबरे यांचे हरिकीर्तन झाले.आज गुरुवार दि.१६ जानेवारी रोजी ह.भ.प.शिवाजी महाराज कोकणे यांचे तर शुक्रवारी ह.भ.प.आजिनाथ महाराज दानवे यांचे हरिकीर्तन होणार आहे. शनिवारी सकळी १० ते १२ या वेळात ह.भ.प. प्रकाश महाराज जंजीरे पिंपळवंडी यांचे सुश्राव्य काल्याचे कीर्तन होणार आहे.काल्याचे कीर्तनानंतर महाप्रसादाचे वाटप होणार आहे.यावेळी आ.सुरेश धस,माजी आ.बाळासाहेब आजबे,माजी आ.भीमराव धोंडे,माजी आ.साहेबराव दरेकर व युवानेते सतीषआबा शिंदे हे उपस्थित राहणार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या