
आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी शहरातील बेलगांव रोडवर असलेल्या संत वामनभाऊ,संत भगवानबाबा प्रतिष्ठानाचे वतीने पंचदिनी कीर्तन महोत्सव अखंड हरिनाम सप्ताहाचे आज शनिवारी ह.भ.प. ब्रम्हचैतन्य महाराज तावरे यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे.साधु, संतांच्या कृपाशीर्वादाने दि.१४ ते दि.१८ जानेवारी या कालावधीत पंचदिनी अखंड हरिनाम सप्ताह झाला आहे.
या काल्याचे कीर्तनाचा भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.या सप्ताहात काकड आरती,विष्णुसहस्त्रनाम,प्रार्थना, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण,हरिपाठ, भोजन, हरिकीर्तन आणि हरिजागर असे विविध धार्मिक कार्यक्रम झाले. आहेत.
ह.भ.प.धर्माचार्य आदिनाथ महाराज आंधळे,विनोदाचार्य ह.भ.प.भरत महाराज जोगी, ह.भ.प.सोमनाथ महाराज कराळे, संत मदन महाराज बिहाणी देवस्थानचे अध्यक्ष ह.भ.प.बबन महाराज बहिरवाल यांचे कीर्तन झाले. आज शनिवार दि.१८ जानेवारी रोजी संतकृपा वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ह.भ.प.ब्रम्हचैतन्य महाराज तावरे यांचे सकाळी ९ ते ११ यावेळात काल्याचे किर्तन होणार आहे. त्यानंतर सामुदायिक महाप्रसाद होईल. या सर्व धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन संत वामनभाऊ मित्र मंडळ आष्टी व परिसरातील ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
---------------------------
0 टिप्पण्या