Ticker

6/recent/ticker-posts

राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या विचाराची समाजाला गरज ............ मुख्याध्यापक वाय.यु. सय्यद

आष्टी (प्रतिनिधी ) आज खऱ्या अर्थाने राष्ट्रमाता,राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या विचाराची समाजाला गरज आहे असे प्रतिपादन मुख्याध्यापक तथा प्राचार्य वाय.यु.सय्यद यांनी केले. धानोरा येथील जनता विद्यालयात स्वामी विवेकानंद जयंती अर्थात राष्ट्रीय युवक दिन आणि राजमाता जिजाऊ यांच्या संयुक्त जयंती कार्यक्रमात ते बोलत होते.प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्याध्यापक ढोबळे सर,पर्यवेक्षक सय्यद सर शिक्षिका श्रीमती अमृता चितळे मॅडम हे उपस्थित होते.मुख्याध्यापक सय्यद सर म्हणाले की,आज सर्व समाज खजिल झाला आहे. त्याचं कारण म्हणजे आपल्या पुढे विचाराचे दिपस्तंभच नाहीत.पुन्हा समाजाची उन्नती,प्रगती चांगल्या दिशेने व्हावी असे वाटत असेल तर माँसाहेब जिजाऊ आणि विवेकानंद यांच्या विचारांची पारायणे घरोघरी आणि चौकाचौकात,गावोगावी घडली पाहिजेत.तरुण पिढीने नवीन ज्ञानाबरोबर आपल्या दिपस्तंभाची आठवण ठेवली पाहिजे.संपुर्ण जगाला ज्ञान देणारे विचारवंत,दिपस्तंभ आपल्या इतिहासात होऊन गेले,याचा सार्थ अभिमान जेव्हा वाटेल तेव्हा तुमच्याकडून कोणतेही दुष्कृत्य होणार नाही.प्रारंभी स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमांच्या पूजनाने सुरुवात झाली. उपमुख्याध्यापक ढोबळे यांनी प्रस्ताविक करताना स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांच्या कार्याविषयी माहिती सांगितली.काल दि.१३ जानेवारी रोजी आष्टी तालुक्यातील धानोरा येथील जनता विद्यालयामध्ये स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांची संयुक्त जयंती मोठ्या थाटात साजरी करण्यात आली.यावेळी विद्यालयाच्या शिक्षिका श्रीमती अमृता चितळे मॅडम यांनी राजमाता जिजाऊच् यांच्या जीवनातील एका प्रसंगावर लघु नाटिका सादर केली.या विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य वाय.यु सय्यद , उपमुख्याध्यापक ढोबळे,पर्यवेक्षक सय्यद सर,सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व उपस्थित होते.संचलन व आभार श्रीमती ढवळे मॅडम यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या