" मनगटात बळ असेल तर
कशाला हवी भीती
वाढवून शान कर्तृत्वाची
ठेवू समाजाशी सु नीती "
समाजाचे आपण देणे लागतो
अशी वृत्ती मनाशी ठेवून, तळागाळातल्या लोकांसाठी काही करून
दाखवण्याची धमक अंगात बाळगून जिद्दीने कार्यरत असलेले आणि उत्तर कराडमधून आमदार
म्हणून निवडून आलेले मनोजदादा घोरपडे आज यशाचे शिखर पादाक्रांत करून कार्य
शक्तीच्या दिशेने वाटचाल करत आहेत. सातारा जिल्ह्यातील मत्त्यापूर या ६०० ते ७००
लोक वस्तीच्या गावातील एक आदर्श व्यक्तिमत्व! ज्या व्यक्तिमत्त्वाची ओळख राजकीय
वर्तुळात किंवा लागेबांधे देखील नव्हते.वडील शिक्षक आणि आई गृहिणी अशा सर्वसाधारण
कुटुंबात जन्मलेले मनोज दादा घोरपडे बालपणापासूनच मुत्सद्दी,करारी,जिद्दी आणि
हटवादी स्वभावाचे! त्यांच्या स्वभावाचे पैलू लोकांच्या लक्षात यायला लागताच लोकांनी
त्यांना भरभक्कम पाठिंबा दिला आणि आज असे हे व्यक्तिमत्व उच्चस्थानावर पोहोचले
आहेत. त्यांची घोडदौड यशाच्या मार्गाने होत आहे.त्यांचे वडील पाच वर्षे जिल्हा
परिषदेत आणि मातोश्री पाच वर्षे जिल्हा परिषदेत कार्यरत असल्यामुळे त्यांनी स्वतःचे
असे एक स्वतंत्र वलय तयार केले आहे. मनोजदादा राजकारणात सक्रिय झाल्यावर
सर्वसामान्य लोकांसाठी त्यांनी आपल्या आयुष्याला झोकून दिले. त्यामुळे आज
सर्वसामान्य जनता त्यांच्या पाठीशी उभी आहे.कराड उत्तरमधील लोकांना नि:स्वार्थी आणि
आपल्यातीलच एक नेता मिळाल्याचा आनंद आहे.आज यशाचे शिखर त्यांनी जरी पादाक्रांत केले
असले तरी गर्व आणि अहंकार त्यांना शिवलेला नाही. त्यांची कामाची पद्धतच अशी आहे की
ते नव्वद टक्के समाजकारण आणि दहा टक्के राजकारण त्यामुळे कार्यकर्त्यांच्या
गळ्यातील ते ताईत बनले आहेत. शेतकरी आणि सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नांना वाचा
फोडण्यासाठी ते त्यांच्या पद्धतीने प्रयत्न करत असतात. शाळा,ऑफिस, ग्रामपंचायत,
ग्राम विकास योजना, रस्ते बांधणी या सर्व विकासकार्यात मनोज दादांचा सिंहाचा वाटा
आहे. आज त्यांची ओळख कराड उत्तरचे युवा नेते म्हणून झाली असली तरी ते जिल्हा परिषद,
वर्णे ,तालुका सातारा या ठिकाणी गेल्या पाच वर्षापासून कार्यरत होते. मनोजदादांचे
तीर्थरूप जिल्हा परिषदेचे माजी सदस्य श्री भीमराव घोरपडे आणि मातोश्री वर्णे जिल्हा
परिषद गटाच्या माजी सदस्या सौ.मंगलताई घोरपडे यांच्यासोबत काम करत दादांनी गावातील
सुधारणांसाठी अविरत प्रयत्न केले आहेत. आज नेता म्हणून पैसे खाणारा अशी
नेत्यांविषयीची प्रतिमा समाजात असताना मनोजदादांनी स्वतःच्या खिशातून आर्थिक निधी
उपलब्ध करून समाजकार्य पुढे नेले आहे. मनोजदादांची राजकीय कार्यकर्ते तशी नवीनच
फेब्रुवारी २०१२ च्या जिल्हा परिषद निवडणुकीत राजकीय पटलावर मनोजदादांचा उदय झाला.
पाच वर्षे कार्यकर्ते व मतदारांच्या संपर्कात राहिल्यामुळे सातारा जिल्ह्यातील
सर्वात लोकप्रिय व तरुण कार्यकर्त्यांची संघटना असणारा नेता म्हणून प्रामुख्याने
जिल्ह्यापासून ते मंत्रालयापर्यंत त्यांचे नाव घेतले जाते. पिताश्रींकडूनच त्यांना
राजकारणाचे बाळकडू आणि बारकावे मिळाले. त्यांचाच वारसा जपत त्यांच्या मातोश्रीदेखील
निवडून आल्या आणि घरात राजकीय वाटचालींना सुरुवात झाली.स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून
लढताना शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलने केली. प्रसंगी जेलमध्ये सुद्धा गेले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेत भरीव कामगिरी केल्यामुळे भाजप नेतृत्वाने त्यांची दखल
घेतली त्यातूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत वर्षा
बंगल्यावर त्यांच्या भाजप प्रवेश सोहळा पार पडला.भाजप प्रवेशानंतर पंतप्रधान
नरेंद्र मोदी,महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री
चंद्रकांत दादा पाटील यांच्या माध्यमातून त्यांनी तळागाळात पक्षाचे काम सुरू केले
मतदार संघातील प्रत्येक गावात स्वतःचा संपर्क ठेवून कार्यकर्त्यांची जाळी विणणे ही
त्यांची कामे करण्याची पद्धत! कार्य करण्यास सहज उपलब्ध होणारा नेता एका फोनवर
कोणत्याही गावात पोहचून लोकांच्या अडचणी सोडवणारा नेता म्हणून प्रतिमा युवा वर्गात
सर्वात लोकप्रिय झाली.मनोजदादांनी राजकारण न करता राजकारणाला समाजकार्याची आणि
मित्रत्वाची जोड दिल्यास लोकं आपणावर किती प्रेम करतात हे त्यांच्या कार्यातून
दिसून येते. एखादा माणूस भेटला की त्याच्याशी मैत्री बनवायची हा त्यांना छंद
असल्यामुळे त्यांचा मित्रपरिवार खूप मोठा आहे.एकदा का मित्र झाला की त्यांच्या
सुखदुःखात धावून जाणे, त्यांचे दुःख आपले समजून ते कमी करण्यासाठी प्रामाणिकपणे
प्रयत्न करणे या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत.दादांनी राजकारणात प्रवेश केल्याच्या
पहिल्या दिवसापासून प्रस्थापित राज्य करणाऱ्या गोष्टींना फाटा देत नवीन
कार्यकर्त्यांना सोबत घेऊन राजकारणाची यशस्वी सुरुवात केली. म्हणून दादांच्या
नेतृत्वाचा झपाट्याने विस्तार होऊ लागला आहे.आगामी काळात हे नेतृत्व आणखी फुलणार
यात शंकाच नाही. श्रीरामप्रभूंना त्यांच्या कार्यात ज्याप्रमाणे लक्ष्मण,भरत आणि
शत्रुघ्न या बंधुराजांकडून सबळ पाठिंबा होता त्यामुळेच रावणासारख्या अघोरी शक्तीला
नष्ट करून स्वराज्य स्थापनेचे कार्य श्रीराम प्रभूंकडून झाले हे आपणा सर्वांना
ज्ञात आहेच.त्याचप्रमाणे मनोज दादांच्या पाठीशी त्यांचे बंधू संग्रामबापू,
विक्रमनाना आणि तडफदार,युवा कनिष्ठ बंधू प्रज्वल पहाडाप्रमाणे उभे
आहेत.त्यांच्यातील प्रेम आणि एकजूट पाहून रामराज्याची आठवण होते.२०१७ साली झालेल्या
जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वसामान्य लोकांच्या पाठिंब्यावर दादांनी विजय मिळवला
होता आणि वर्णे गटाचे सारथ्य स्वतःच्या खांद्यावर पेलले होते.भाजप पक्षात प्रवेश
केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील,सहकार
परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भाजप पश्चिम
महाराष्ट्र सरचिटणीस अतुल भोसले,जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या साथीने कराड
उत्तरमध्ये विकास कामांचा झंझावात सुरू ठेवला. त्यामुळे आता कराड उत्तरमधून मनोज
दादांना विधानसभा फार दूर नाही हेच अटळ सत्य आहे. सौ.भारती सावंत खारघर,नवी मुंबई
मो.9653445835
0 टिप्पण्या