Ticker

6/recent/ticker-posts

आष्टी (प्रतिनिधी) आष्टी येथील ॲड.बी.डी.हंबर्डे महाविद्यालयाचे इंग्रजी विभाग प्रमुख, साहित्याचे अभ्यासक प्रा.डॉ.अभय शिंदे यांनी माझ्या " झिंदाबाद...मुर्दाबाद " कविता संग्रहातील निवडक कवितांचा इंग्रजी अनुवाद faces behind masks हे शीर्षक पुस्तक रूपाने दि.१ जानेवारी २०२५ रोजी नववर्ष कविता उत्सवात संस्थाध्यक्ष किशोरनाना हंबर्डे यांच्या हस्ते प्रकाशित होत आहे. या पुस्तकासाठी किशोरनाना हंबर्डे आणि प्राचार्य डॉ.सोपान निंबोरे यांच्या शुभेच्छा लाभलेल्या आहेत.पुस्तकाच्या मलपृष्ठावर ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ख्यातनाम साहित्यिक,अभिनेता गिरीश कर्नाड यांच्या हस्तलिखितात कवितासंग्रह वाचून मांडलेला अभिप्राय पाठराखणीला आहे.कवी सय्यद अल्लाउद्दीन यांच्या कुसुमाग्रज पुरस्कार प्राप्त या संग्रहातील... " कोण म्हणतो लोकशाही आलीच नाही.. " या कवितेने महाराष्ट्रभर ख्याती मिळवून दिली. कविश्रेष्ठ कुसुमाग्रज,भालचंद्र नेमाडे, कवी ग्रेस, समाजसेवक अण्णा हजारे, मंगेश पाडगावकर, रानकवी ना.धों. महानोर,माजी उपमुख्यमंत्री आर.आर. पाटील,आबा.,प्रख्यात अभिनेता निळू फुले यांनी ही कविता मन लावून ऐकली होती. शिवाय तीन वेळा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात वन्स मोअर झाली आहे. या " झिंदाबाद... मुर्दाबाद " कविता संग्रहातील निवडक कवितांचा इंग्रजी अनुवाद प्रा.डॉ.अभय शिंदे द्वारा पुस्तक रूपाने वाचकांसाठी येत आहे. हा माझा आणि माझ्या कवितांचा सन्मान आहे. यानिमित्ताने जगभरातील साहित्यिक आणि रसिकांपर्यंत माझ्या कविता पोहचतील याचा मला आनंद वाटतो असे कवी प्रा.सय्यद अल्लाउद्दीन यांनी पत्रकारांशी बोलताना सांगीतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या