आष्टी

आष्टी (प्रतिनिधी)
आनंद संप्रदायातील संतश्रेष्ठ वै.सद् गुरु नाना महाराज यांचे शिश्योत्तम असलेले श्री क्षेत्र पिंपळा येथील मठाधिपती ह.भ. प.नारायण महाराज वाळके हे गेल्या अनेक वर्षांपासून सर्व प्रापंचिक त्याग करून सदैव हरिनाम चिंतन आणि वारकरी संप्रदायाची सेवा करत आहेत. आनंद संप्रदायांमध्ये सद्गुरु नानामहाराज यांचे खूप मोठे योगदान महाराष्ट्रात लाभलेले आहे.महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये सद् गुरु नानामहाराज यांचा अनुग्रह घेतलेले अनेक साधक आहेत. त्यांच्या सानिध्यात राहून अनुग्रह प्राप्त करून घेतलेले आणि परमार्थाचा वसा नाना महाराजांच्या पाठीमागे ही अतिशय उत्तमरित्या चालवत असलेले ,कायमस्वरूपी सद् गुरु नानामहाराजांच्या मठामध्ये स्थायिक झालेले ह.भ.प.नारायण महाराज वाळके यांनी अतिशय खडतर तपश्चर्या करण्याचे ध्येय अंगी बाळगलेले आहे. अहो रात्र फक्त ईश्वर चिंतन आणि नामस्मरण यामध्येच ते संपूर्णतः रत झालेले दिसत आहेत.मानवी जीवनात जन्माला आल्यानंतर जीवन सार्थकी लावण्यासाठी कशा प्रकारची भक्ती करणे आवश्यक आहे याचे सदोदित मार्गदर्शन भक्त परिवारासाठी ते करत असतात.आपल्या कीर्तन,प्रवचन सेवेसाठी कुठेही गेले तरी ते कुणाच्याही एक रुपयाला देखील हात लावत नाहीत, कसलेही मानधन घेत नाहीत. कुठेही चहापाणी, जेवण घेत नाहीत.मठांमध्ये स्वतःच्या हाताने केलेले जेवण २४ तासातून फक्त एकदाच घेतात.यापूर्वी पिंपळा ते पंढरपूर दोन वेळा अन्नपाण्याचा घोटही न घेता त्यांनी खडतर पायी वारी केलेली आहे.यावर्षी धाकली कार्तिकी, उत्पत्ती एकादशी व आळंदी यात्रेच्या निमित्ताने श्री सद्गुरू नारायण महाराज यांनी पिंपळा ते श्री क्षेत्र आळंदी हा पायी वारीचा केलेला संकल्प पूर्ण केला आहे.२० भाविकांना सोबत घेऊन १६० कि.मी.चे अंतर
पाण्याचा घोटही न घेता अडीच दिवसांमध्ये त्यांनी पायी चालून पूर्ण केले.परिसरातील भक्तवर्ग मधून पिंपळा मठामध्ये जाऊन अनेक भाविकांनी या प्रसंगी महाराजांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.
0 टिप्पण्या