
आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी शहरातील माऊली सेवा मंडळाचे सदस्य आणि प्लाॕटींग विक्रेते सुरेश बक्षी (वय ५५) यांचे हृदयविकराच्या झटक्याने निधन झाले आहे.मुळचे टाकळसिंग
येथिल सध्या आष्टीत वास्तव्यास असलेले प्रसिद्ध प्लॉटिंग विक्रेते सुरेश बक्षी यांचे शुक्रवारी रात्री निधन झाले.आष्टी तालुक्यातील टाकळसिंग गावातील मूळ रहिवासी असलेले सुरेश बक्षी हे मागील अनेक वर्षापासून आष्टी येथे वास्तव्यास राहत आहेत.सुरेश बक्षी यांनी आष्टी शहरासह जामखेड,मिरजगाव,
करमाळा,कडा या परिसरात मोठ्या प्रमाणात प्लॉटिंग विक्रेत्याच्या व्यवसायाच्या माध्यमातून आपले नावलोकीक केला आहे. शांत,संमयी,हसतमुख चेहरा असणारे आणि भाविक असणारे सुरेश बक्षी होते.बक्षी यांना शुक्रवारी रात्री अचानक छातीत दुखू लागल्याने हृदयविकाराचा तीव्र झटका आला.त्यानंतर त्यांना अहिल्यानगर येथील सुरभी हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांचे निधन झाले असे सांगीतले.त्यांच्यापाठीमागे पत्नी,मुलगा,मुलगी,सुना,नातवंडे असा परिवार आहे शनिवार दि.२८ डिसेंबर रोजी दुपारी आष्टी येथील नगर-बीड रस्त्यालगत असलेल्या बस स्टॕन्ड जवळील स्मशानभूमीत अंत्यविधी झाला.यावेळी सामाजिक,राजकीय, धार्मिक, शिक्षण, व्यापार क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
0 टिप्पण्या