Ticker

6/recent/ticker-posts

जळगावचे राम धुमाळ सनदी लेखापाल परीक्षा उत्तीर्ण

आष्टी (प्रतिनिधी) द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया मार्फत घेण्यात येणाऱ्या सनदी लेखापाल अर्थात सीए या परीक्षेचा निकाल नुकताच घोषित करण्यात आला आहे.यामध्ये जळगाव तालुका आष्टी येथे राम अशोक धुमाळ हा विद्यार्थी उत्तीर्ण झाला आहे.राम अशोक धुमाळ या विद्यार्थ्याने बी.कॉमची परीक्षा सिंहगड इन्स्टिट्यूट,पुणे येथून उत्तीर्ण केलेली आहे.एम.कॉम. आनंदराव धोंडे महाविद्यालय,कडा येथून पूर्ण केलेले आहे.सध्या तो स्वतंत्र सेनानी रामराव आवरगावकर विधी महाविद्यालय,बीड येथे अंतिम वर्षामध्ये कायद्याचे शिक्षण घेत आहे.राम धुमाळ हा २०१८ पासून पुणे येथे भाऊ लक्ष्मण सोबत राहून सीएची तयारी करत आहे.या परीक्षेतील सर्व टप्पे त्याने यशस्वीरित्या उत्तीर्ण केलेले आहेत.नुकत्याच घोषित झालेल्या अंतिम निकालात त्याने हे यश संपादन केले आहे.अत्यंत सामान्य शेतकरी कुटुंबातून त्यांनी हे यश मिळवलेले आहे.त्याच्या या यशाबद्दल आ.सुरेश धस,आष्टी दूध संघाचे चेअरमन शांतिनाथ भोसले,पोपट धुमाळ,
भरत जाधव,संचालक अशोक पवार,माजी सरपंच राम धुमाळ,माजी सरपंच मधुकर गिर्‍हे,अशोक वाळके,कवी हरीश हातवटे यांच्यासह ग्रामस्थ व नातेवाईकांनी त्याचे अभिनंदन केले. आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या