Ticker

6/recent/ticker-posts

आष्टीचे लक्ष्मण दिवटे यांना संत नामदेव राष्ट्रीय कथा पुरस्कार प्रदान

आष्टी(प्रतिनिधी) लेखक लक्ष्मण दिवटे हे आष्टी तालुक्यातील बीडसांगवी येथील रहिवाशी आहेत.ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करडुळेवस्ती केंद्र बेलगाव येथे सहशिक्षक म्हणून कार्यरत आहेत.उसवण हा त्यांचा पहिलाच कथासंग्रह महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या नवलेखक अनुदान योजनेतून पायगुण प्रकाशन अमरावती यांनी तो प्रकाशित केलेला आहे.समृद्धी प्रकाशन संस्था हिंगोली आयोजित 'संत नामदेव राष्ट्रीय कथासंग्रह साहित्य पुरस्कार' हा प्रतिष्ठेचा पुरस्कार उसवण कथासंग्रहाला देण्यात आला.आकर्शक स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.हा पुरस्कार डॉ.श्रीराम कऱ्हाळे यांच्यातर्फे ऑनलाईन पद्धतीने देण्यात आला आहे. उसवण हा ग्रामीण जीवनाचे वास्तव चित्रण करणारा कथासंग्रह असून त्यास अनेक पुरस्कार मिळालेले आहेत.त्यांचे सर्व स्तरातुन कौतुक होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या