सातारा(प्रतिनिधी)
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची धग आता राज्यभर पसरू लागली आहे.सरपंच परिषदने सातारा येथील महामार्ग रोखत जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रचंड मोर्चा धडकला. या मोर्चाचे नेतृत्व सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्रचे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे यांनी केले.सकाळी १२ च्या सुमारास सातारा जिल्हाभरातील सरपंचानी थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.त्यानंतर सरपंचानी सातारा येथे महामार्ग रोखला.यावेळी बोलतांना सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे म्हणाले की,संतोष देशमुख याची हत्या ही पंचायत राज व्यवंस्थेच्या गळ्याला नख लावण्याचा प्रकार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सरपंचाचे पाठीराखे असल्याचे आम्ही अनेक वेळा म्हटलं आहे.मात्र देशमुख हत्या प्रकरणी आरोपींना अटक करण्यासाठी एवढा वेळ का लागतो ? यामुळे राज्यातील सरपंच बांधवात अस्वस्थता आहे.तात्काळ आरोपींना अटक करण्यात यावी अशीही मागणी दत्ताभाऊ
काकडे यांनी केली.यावेळी राज्य विश्वस्थ तथा कोषाध्यक्ष आनंद जाधव,पश्चिम महाराष्ट्र सचिव संजय शेलार,उपाध्यक्ष समाधान पोपळे,कोअर कमिटी उपाध्यक्ष अरुण कापसे,महिला जिल्हाध्यक्षा मेघताई नलावडे,जिल्हा सचिव शत्रुघ्न धनवडे,जिल्हा समन्वयक महेश दादा गाडे,धावडे जिल्हासंपर्क प्रमुख चंद्रकांत सणस,तालुकाध्यक्ष अनिल सोनमळे,कोरेगाव तालुकाध्यक्ष प्रशांत पवार,जावली तालुकाध्यक्ष पुंडलिक पार्टे,जिल्हा उपाध्यक्ष ब


जीरंग चौधरी,तालुका सचिव देवरे महिला अध्यक्षा मेघा माने,चोराबे सरपंच सपकाळ आदी उपस्थित होते.
0 टिप्पण्या