Ticker

6/recent/ticker-posts

शिक्षक नेते सुभाष भादवे यांना क्रांतीबा ज्योतीबा फुले

आष्टी (प्रतिनिधी) आष्टी तालुक्यातील स्वामी विवेकानंद शिक्षकांची सहकारी पतसंस्थेचे माजी व्हाईस चेअरमन तथा आष्टी तालुक्यातील सुलेमान देवळाचे सुपुत्र असलेले आणि सध्या जि.प. केरूळ शाळेचे उपक्रमशील शिक्षक सुभाष भादवे यांना यंदाच्या क्रांतीबा ज्योतिबा फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे.महाराष्ट्र अंडर प्रिव्हिलेज्ड टीचर्स असोसिएशनच्या (मुप्टा) वतीने देण्यात येणाऱ्या सन २०२४ च्या क्रांतीबा ज्योतिबा फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराची घोषणा मुष्टाचे जिल्हाध्यक्ष प्रा.प्रदीप रोडे यांनी जाहीर केली. यामध्ये ही निवड झाली आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा दि.२९ डिसेंबर रोजी बीड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात सकाळी १० वाजता संपन्न होणार आहे. शिक्षणप्रेमी आणि समाजातील सर्वच घटकांनी व पुरस्कार प्राप्त शिक्षकांनी सहकुटुंब उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या