आष्टी(प्रतिनिधी)
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,छत्रपती संभाजीनगर या विद्यापीठाची पीएच.डी.अर्थात विद्यावाचस्पती ही पदवी आष्टी तालुक्यातील वाळुंज येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील येथील राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक हरिष नवनाथ हातवटे यांना मराठी भाषेतील 'प्रशासकीय अधिकाऱ्यांचे आत्मकथन - एक शोध 'या संशोधनासाठी प्राप्त झाली आहे.हरिष हातवटे यांनी आयएएस अधिकारी निला सत्यनारायण,रमेश घोलप,विजय कुलांगे,राजेश पाटील,आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील,मिरा बोरवणकर,जे.एफ.रिबेरो,

आयआरएस अधिकारी संदीपकुमार साळुंखे,भरत आंधळे व भारतीय परराष्ट्र सेवेतील अधिकारी ज्ञानेश्वर मुळे यांच्या आत्मकथनांचा चिकित्सक अभ्यास करुन हा प्रबंध सादर केलेला आहे.
दि.२० डिसेंबर रोजी ही मौखिक परीक्षा आॕनलाईन स्वरुपात संपन्न झाली.या मौखिक परीक्षेसाठी बहिस्थ परीक्षक डाॅ.माजोद्दीन मुतावली,मराठी विभागप्रमुख,राणी चेन्नमा विद्यापीठ, बेळगाव,कर्नाटक तसेच अध्यक्ष म्हणून डॉ.कैलास अंभुरे मराठी विभाग,डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,छत्रपती संभाजीनगर व हरिष हातवटे यांचे संशोधन मार्गदर्शक डाॅ.गजानन पांडुरंग जाधव मराठी विभागप्रमुख लोकसेवा महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर हे मान्यवर परीक्षक उपस्थित होते.
या ऑनलाइन मौखिक परीक्षेसाठी प्राचार्य डॉ.सोपान निंंबोरे,प्राचार्य डॉ.हरिदास विधाते,कवी सय्यद अल्लाउद्दीन,प्रा.डाॅ.अभय शिंदे,प्रा.डाॅ.आबासाहेब पोकळे,प्रा.डाॅ.स्वाती चौधरी,प्रा.डाॅ.गोपीनाथ बोडखे,प्रा.संतोष बोरुडे,प्रा.रामदास हातवटे,प्रा.अनिल खुरांगे,डाॅ.रमेश खिळदकर,डाॅ.राजाराम सोनटक्के, डाॅ.विठ्ठल जाधव,शिवचरित्रकार ज्ञानदेव काशिद,व्याख्याते धर्मराज करपे,प्रा. अमोल घुमरे,डाॅ.अशोक उढाणे,राहूल मुटकुळे,चांगदेव तरटे,साखरे सर,संदीप चौधरी,अशोक चौधरी,शिक्षिका जया हातवटे,सुनिता धुमाळ यांसह आष्टी तालुक्यातील मित्र शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या यशाबद्दल तालुक्यातील पदाधिकारी,अधिकारी व मित्रमंडळी यांनी हरिष हातवटे अभिनंदन केले आहे.
0 टिप्पण्या