Ticker

6/recent/ticker-posts

कडा येथे बाबाजी यांचे स्मृतीप्रित्यर्थ आनंदराव धोंडे आंतर महाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन .............. प्राचार्य डाॕ.हरिदास विधाते

आष्टी (प्रतिनिधी) आनंदराव धोंडे ऊर्फ बाबाजी महाविद्यालयामध्ये बाबजी यांचे स्मृती प्रित्यर्थ कडा येथील आनंदराव धोंडे आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा २०२४ चे आयोजन करण्यात आले आहे.विद्यार्थ्यांचे कला गुणांना संधी प्राप्त होऊन त्याच्यातील नवनवीन विचारांना चालना मिळावी तसेच वक्तृत्व गुण कौशल्ये विकसित व्हावे या उद्देशाने गेल्या १३ वर्षापासून सातत्याने ही राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली जाते. हे स्पर्धेचे १४ वे. वर्ष असून यावर्षी वक्तृत्व स्पर्धा शनिवार दि.२८ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी १० वाजता आयोजित केली आहे. स्पर्धेचे विषय - अमृत महोत्सवी भारतीय संविधान ,भारताचे महान सुपुत्र - पद्मविभूषण रतन टाटा व महिला सुरक्षा - चिंता व चिंतन हे विषय आहेत. या स्पर्धेचे पारितोषिक सांघिक प्रथम पारितोषिक -आनंदराव धोंडे फिरता करंडक व प्रमाणपत्र राहील. वैयक्तिक पारितोषिक - प्रथम क्रमांक - ७ हजार रूपये ,स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांक - ५ हजार रुपये स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र ,तृतीय क्रमांक - ३ हजार रूपये , स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र आणि उत्तेजनार्थ (दोन बक्षिसे) प्रत्येकी १ हजार रूपये स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र असे आहे.नियम व अटी - स्पर्धा महाराष्ट्रातील सर्व कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी खुली राहील.स्पर्धकांनी आपले विचार मराठी भाषेत व्यक्त करावेत.स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येतील.परीक्षकांचा निर्णय अंतिम व बंधनकारक असून स्पर्धेसंबंधी नियमात काही कारणाने बदल करण्याचे हक्क संयोजकांनी राखून ठेवले आहेत. महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांच्या एका संघाला स्पर्धेत सहभागी होता येईल. स्पर्धक संघाने प्राचार्यांचे संमतीपत्र व ओळखपत्र शुक्रवार दि.२८ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजेपर्यंत संयोजन समितीच्या देणे गरजेचे आहे. प्रत्येक स्पर्धकाला ०५ + २ = ०७ मिनिटे वेळ मिळेल.प्रत्येक संघास १०० रुपये प्रवेश फी राहिल. स्पर्धकांची निवास व भोजन व्यवस्था केली जाईल.स्पर्धकांचा प्रवास खर्च संबंधीत महाविद्यालयाने करावा. तरी महाराष्ट्रातील कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे अवाहन स्पर्धा संयोजन समिती अध्यक्ष तथा डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्राचार्य डाॕ.हरिदास विधाते यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी उपप्राचार्य डाॕ.भास्कर चव्हाण, उपप्राचार्य डॉ.संभू वाघुले,उपप्राचार्य डॉ.बी.एस्.खैरे,मोबा. क्र. 9422930170,प्रा.डॉ.जी. पी.बोडखे मोबा. क्र. 9545921232 ,प्रोफेसर एम.आर.पटेल मोबा.क्र. 9011608047 यांच्याशी संपर्क करावा असे संयोजन समितीने आवाहन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या