Ticker

6/recent/ticker-posts

आष्टी ग्रामीण रुग्णालयात रांगोळी व चित्रकला स्पर्धा घेऊन 'जागतिक एड्स' दिन साजरा

आष्टी (प्रतिनिधी) जागतिक एड्स दिनानिमित्ताने आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात येथे जिल्हा शिल्लक चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा कार्यक्रम अधिकारी सुहास कुलकर्णी, वैद्यकीय अधीक्षक डॉ.राहुल टेकाडे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.राजेश तांदळे यांच्या संयुक्त विद्यमानाने चित्रकला व रांगोळी स्पर्धा घेऊन एचआयव्ही/एड्सची जनजागृती करण्यात आली. या स्पर्धेसाठी आष्टी व कडा येथील नर्सिंग व फार्मसी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.दि.३ डिसेंबरला चित्रकला स्पर्धा व दि.४ डिसेंबरला रांगोळी स्पर्धा आयोजित केल्या होत्या. यामध्ये Take the rights path: My Health, My right! या वर्षाच्या Theme प्रमाणे एचआयव्ही/एड्स या विषयावरती रांगोळी काढून साजरा केला. यावेळी डॉ राहुल टेकाडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना समाजात एड्सबद्दल त्या रुग्णांना चांगली वागणूक दिली जात नाही.त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे समाजात त्यांना जगण्याचा अधिकार आहे त्यांना आधार देण्याची गरज आहे व लग्न जमवते वेळेस मुलांची व मुलींची एचआयव्ही तपासणी करून घेणे हे काळाची गरज आहे. एड्स हा आजार कमी करण्यासाठी युवकांनी सहभाग घ्यावा व या आजाराबद्दल असलेली भीती दूर करण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा व विद्यार्थ्यांनी काढलेल्या चित्रकला व रांगोळी याबद्दल त्यांचे कौतुक केले चित्रकला स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक - पवार गायत्री, द्वितीय - उज्वला लाडवी, तृतीय - शेख निझाम, उत्तेजनार्थ - धस ऋतुजा, आणि सावंत श्रद्धा, व रांगोळी स्पर्धेमध्ये प्रथम - गायकवाड सानिका, द्वितीय- किरण गोविंद काळे, तृतीय - प्रणाली अरखराव, उत्तेजनार्थ - शेख निझाम आणि ऋतुजा जवंजाळ यांना बक्षीस मिळाले.या स्पर्धेसाठी डॉ.राहुल टेकाडे, डॉ.राजेश तांदळे तालुका आरोग्य अधिकारी सर्व अधिकारी व जन औषधी मेडिकल यांनी स्वतः बक्षीस ठेवून ही स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेसाठी आयसीटीसी विभागाचे जयचंद नेेलवाडे, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, समुपदेशक सुनील सरवदे यांनी नियोजन केले.यावेळी डॉ.राहुल टेकाडे, डॉ.ढाकणे, डॉ.जावळे, डॉ. इमरान शेख,शेख बी (इन्चार्ज सिस्टर), जयचंद नेलवाडे, सुनील सरवदे, स्नेहल राऊत, प्रतिभा गायकवाड, शेख अस्पीया,निकिता कोळी,अश्विनी झुंजारे, प्रीती काळे, मोबीन सय्यद, संदिपान धस, मोहन गलांडे, गौरव साठे, रूपाली पवार, खान सर, झगडे सर,गावडे मॅडम, फुदे मॅडम, जायबा मॅडम, मुरकुटे मॅडम, बबन भवर सर्व कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या