Ticker

6/recent/ticker-posts

लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांची मंत्रीपदी वर्णी लागताच आष्टीत सविताताई गोल्हार व डाॕ.शैलेजा गर्जे यांनी तोफा वाजवुन,पेढे भरवुन केला आनंदोत्सव

आष्टी (प्रतिनिधी) मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्री मंडळात कोणाची वर्णी लागेल, कोणाची नाही.. यावर ऊलट सुलट चर्चा होती.मात्र लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या कन्येला संधी मिळणारच हे फिक्स असताना जिल्ह्यात अनेक जण अनेक राजकीय गणित बांधत होते अखेर आज महायुती सरकारमधील नव्या मंत्र्यांचा शपथविधी पार पडला. सायंकाळी नागपुरातील राजभवनावर हा शपथविधी सोहळा पार पडला. यामध्ये मंत्रीपदासाठी कोणाची वर्णी लागणार याची जोरदार चर्चा सुरू होती. मात्र कार्यकर्त्यांमध्ये आपल्याच नेत्याला मंत्रिपद मिळावं अशी सुप्त भावना पाहायला मिळत होती.विधान परिषद सदस्या लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांना मंत्रिपदासाठी फोन आला ही माहिती मिळताच मंत्री पदासाठी पंकजाताई मुंडे यांची वर्णी लागताच आष्टी शहरातील लोकनेते गोपीनाथराव मुंडे चौकात बीड जि.प.च्या माजी अध्यक्षा सौ. सविताताई विजय गोल्हार,भाजप महिला आघाडीच्या नेत्या डाॕ.शैलेजा गर्जे यांनी येऊन १०० तोफा वाजवुन, फटाके वाजवीत,पेढा भरवुन आनंदोत्सव साजरा केला.यावेळी बीड जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सौ. सविताताई गोल्हार,भाजप नेत्या डॉ. शैलजा गर्जे, माजी नगरसेवक बाळासाहेब शिंदे,सेवा सोसायटी चेअरमन मच्छिंद्र आंधळे,ज्येष्ठ शिवाजी आंधळे,ओम गोल्हार,माजी सरपंच एम.डी.लटपटे, खंडू गर्जे,महेश सोनवणे यांच्यासह विविध कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.आष्टी शहरातील लोकनेते गोपीनाथराव मुंडे चौक आणि समाजसेवक विजय गोल्हार यांचे संपर्क कार्यालयासमोर अतिशय जल्लोषामध्ये फटाके फोडून,तोफा वाजून,पेढे भरून आनंदोत्सव साजरा केला.भाजपच्या राष्ट्रीय नेत्या दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची कन्या लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांना मंत्रिपदासाठी फोन आला.आष्टीत पंकजाताई मुंडे समर्थक कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा करण्यात आला आहे.पंकजाताई मुंडे यांना फोन येताच सर्व ताईभक्तांनी " मी पंकजा गोपीनाथ मुंडे ईश्वर साक्ष शपथ घेते की... " असा स्टेट्स ठेवले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या