Ticker

6/recent/ticker-posts

कडा शहरात प्रत्येक घरोघरी दारासमोर रांगोळी काढून शोभायात्रा रथाचे स्वागत ------------------------------- शोभायात्रेने संत मदन महाराज यांच्या २८ व्या.पुण्यतिथी सोहळ्यास प्रारंभ

आष्टी (प्रतिनिधी) संत मदन महाराज बिहाणी यांच्या २८ व्या.पुण्यतिथीनिमित्त हरिनाम सप्ताह , रामकथा व कीर्तन सोहळ्यास भव्य दिव्य अशा शोभायात्रेने प्रारंभ झाला. कडा शहरातील बाजारपेठेतील संत मदन महाराज यांच्या जुन्या मठापासून सनई चौघड्याच्या सुरामध्ये व सजवलेल्या रथामध्ये संत मदन महाराज यांच्या प्रतिमेची व पादुकेची मिरवणूक झाली.संत मदन महाराज संस्थांनचे अध्यक्ष ह.भ.प.बबन महाराज बहिरवाल आणि ग्रामस्थांच्या हस्ते पादुकांचे पुजन करून शोभायात्रेस प्रारंभ झाला.यावेळी गावातील प्रत्येक घरोघरी दारासमोर रांगोळी काढून शोभायात्रा रथाचे ठिकठिकाणी स्वागत केले.महिला वर्गांनी ह.भ.प.बबन महाराज बहिरवाल यांचे औक्षण करत मिरवणुकीत सहभाग नोंदवला.संपूर्ण गावभरातून मिरवणूक काढून संतनगर येथील संत मदन महाराज यांच्या समाधीस्थळी मिरवणुकीची सांगता करण्यात आली.संतनगरात २८ व्या. पुण्यतिथीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह सोहळा व कीर्तन महोत्सवास मोठ्या भक्तीमय वातावरणात प्रारंभ करण्यात आला.या मिरवणुकीमध्ये सरपंच भीमराव पाटील,उपसरपंच दीपक कर्डिले,कडा कृ.उ.बा.समितीचे सभापती रमजान तांबोळी,माजी सभापती संजयनाना ढोबळे,माजी उपसरपंच बाळासाहेब कर्डीले,राजाबापु कर्डीले, माजी चेअरमन आण्णासाहेब नाथ, संभाजी कर्डिले,बबलू पानसरे,सुभाष मामा सोनवणे,प्राचार्य डाॕ.हरिदास विधाते,संतोष भंडारी,गोरख कर्डीले, नागेश कर्डीले, राम ससाणे,प्रा.डाॕ.शाम सांगळे,लक्ष्मण कर्डीले,कृष्णा महाराज, रघुनाथ कर्डीले,माजी चेअरमन बंडु शिंदे, माजी चेअरमन श्रीकृष्ण पाटील,मधु कर्डीले,सत्रे यांच्यासह ग्रामस्थ व भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या