Ticker

6/recent/ticker-posts

लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांची मंत्रीपदी वर्णी लागताच आष्टीत माजी आ.भीमराव धोंडे समर्थकांनी १०० तोफा वाजवुन केला आनंदोत्सव .......... युवा नेते अजयदादा धोंडे यांनी पेढे भरुन केला जल्लोष

आष्टी (प्रतिनिधी) महायुती सरकारमधील नव्या मंत्र्यांचा शपथविधी आज पार पडला.संध्याकाळी चार वाजता नागपुरातील राजभवनावर हा शपथविधी सोहळा पार पडला. यामध्ये मंत्रीपदासाठी कोणाची वर्णी लागणार याची जोरदार चर्चा सुरू होती. मात्र कार्यकर्त्यांमध्ये आपल्याच नेत्याला मंत्रिपद मिळावं अशी सुप्त भावना पाहायला मिळत होती.विधानपरिषद सदस्या लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांना मंत्रिपदासाठी फोन आला ही माहिती मिळताच मंत्री पदासाठी पंकजाताई मुंडे यांची वर्णी लागताच आष्टी विधानसभा मतदार संघाचे माजी आ.भीमराव धोंडे यांच्या कार्यकर्त्यांनी आष्टीत जल्लोष व आनंदोत्सव केला.भाजपच्या राष्ट्रीय नेत्या दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची कन्या लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांना मंत्रिपदासाठी फोन आला.आष्टीत माजी आ.भीमराव धोंडे यांच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा करण्यात आला आहे. दरम्यान मुंडे यांना फोन येताच युवा नेते अजयदादा धोंडे यांनी " मी पंकजा गोपीनाथ मुंडे ईश्वर साक्ष शपथ घेते की... " असा स्टेट्स ठेवून ताईंचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या तर कार्यकर्त्यांनी देखील फटाक्यांची आतिषबाजी आणि १०० तोफांची सलामी देऊन जल्लोष साजरा केला. ?

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या