
आष्टी (प्रतिनिधी) आष्टी तालुका विधी सेवा समिती व आष्टी वकील संघ यांच्या संयुक्त
विद्यमाने आष्टी शहरातील श्री गणेश विद्यालयात कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे आज
दि.२६ डिसेंबर रोजी आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून मुख्य
दिवाणी न्यायाधीश श्रीमती पी.जी.इनामदार तसेच दुसरे सहदिवाणी न्यायाधीश श्रीमती
एस.व्ही.उतकर उपस्थित होत्या. अध्यक्षस्थानी आष्टी वकील संघाचे उपाध्यक्ष किशोर
निकाळजे होते, तर कार्यक्रमास सचिव वाय.टी.सय्यद, वकील जी. व्ही. निकाळजे, डी. सी.
शेख,उध्दव पोकळे,एस.आर. चव्हाण,संग्राम गळगटे,बी.बी.गर्जे, आबासाहेब आजबे आदी वकील
बांधव उपस्थित होते.यावेळी लहान मुलांचे हक्क, हुंडाबळी विरोधी कायदे,जातीभेद,
स्त्रीभ्रूण हत्या आणि सामाजिक दुष्कृत्ये व पॉस्को कायदा या विषयांवर विविध
वक्त्यांनी मार्गदर्शन केले. मुख्य दिवाणी न्यायाधीश श्रीमती पी.जी.इनामदार यांनी
सर्वसमावेशक असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक रमेशसिंह
देसूरकर, तावरे व शिक्षकवृंद, न्यायालयीन कर्मचारी ए. जे. जाधव, बी.एन.उगले उपस्थित
होते. सूत्रसंचालन ॲड.बी.बी. गर्जे यांनी केले तर आभार सचिव वाय.टी. सय्यद यांनी
मानले.
0 टिप्पण्या