Ticker

6/recent/ticker-posts

बीड येथे होणाऱ्या विराट मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे ............... जिल्हाध्यक्ष यशवंत खंडागळे

आष्टी (प्रतिनिधी) मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्या प्रकरणी आज शनिवार दि.२८ डिसेंबर २०२४ रोजी आयोजित बीड येथील सर्वपक्षीय मोर्चात बीड जिल्ह्यातील डाॕ.बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमचे सर्व कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन डाॕ.बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमचे जिल्हाध्यक्ष यशवंत खंडागळे यांनी केले आहे. याविषयी अधिक माहिती अशी की, मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आलेली आहे.या खून प्रकरणातील सर्व आरोपी आणि सूत्रधार यांना अटक करण्यात यावी या मागणीसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर आज शनिवार दि.२८ डिसेंबर २०२४ रोजी सर्वपक्षीय मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण आणि अमानवी हत्येतील मुख्य आरोपी अजूनही मोकाट आहेत. सर्व आरोपींना तीन दिवसांत अटक करतो हे आश्वासन शासनाला पूर्ण करता आलेले नाही.महाराष्ट्राच्या सर्वोच्च सभागृहात चर्चा झाली.मुख्यमंत्र्यांनी न्यायालयीन चौकशी आणि एसआयटीचे आदेश दिले परंतु आश्वासनाच्या पलीकडे काहीच घडले नाही.कदाचित लोकांनी हे प्रकरण विसरून जावे यासाठी वेळ दवडला जात आहे.मुख्य आरोपीला अटक होण्यासाठी, निष्पाप सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी, बीड जिल्ह्यातील गुंडगिरी व दहशत संपवण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक बीड येथून विराट मोर्चा सुरु होणार आहे.सर्व जाती धर्मातील लोकांनी आणि आमचे डाॕ.बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमचे जिल्ह्यातील पदाधिकारी व सर्व कार्यकर्त्यांनी बीड येथे होणाऱ्या सर्वपक्षीय विराट मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन डाॕ.बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमचे जिल्हाध्यक्ष यशवंत खंडागळे यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या