Ticker

6/recent/ticker-posts

आष्टी येथील महेश आयुर्वेद महाविद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

आष्टी (प्रतिनिधी) विश्वारत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या. महापरीनिर्वाण दिनानिमित आष्टी येथील महेश आयुर्वेद महाविद्यालयात अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी संस्थेचे प्रशासन अधिकारी डॉ.डी.बी.राऊत, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत गोसावी,उपप्राचार्य डॉ.मोहिनी गोसावी , प्रा.डाॕ. सविता खेडकर, डॉ.विशाल हेंड, डॉ. राहुल काळे उपस्थित होते. याप्रसंगी विद्यार्थिनी श्रुती वानखडे हिने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या " प्रॉब्लेम ऑफ रुपी " या पुस्तकातील काही आठवणी उजाळा दिला. अक्षदा शेळके या विद्यार्थिनींनी वेटिंग फॉर व्हिजा या पुस्तकातील त्यांच्या आठवणींना उजाळा दिला व यासोबतच थोरात समीक्षा ,ऋषिकेश उपासे, सागर भक्ते या विद्यार्थ्याने महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे आभार प्रा.डाॕ.सविता खेडकर यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या