आष्टी (प्रतिनिधी)
मराठा सेवक सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण आणि अमानवी हत्येतील मुख्य आरोपी अजूनही मोकाट आहेत. सर्व आरोपींना तीन दिवसांत अटक करतो हे आश्वासन शासनाला पूर्ण करता आलेले नाही.महाराष्ट्राच्या सर्वोच्च सभागृहात चर्चा झाली.मुख्यमंत्र्यांनी न्यायालयीन चौकशी आणि एसआयटीचे आदेश दिले परंतु आश्वासनाच्या पलीकडे काहीच घडले नाही.कदाचित लोकांनी हे प्रकरण विसरून जावे यासाठी वेळ दवडला जात आहे. मुख्यआरोपीलि अटक होण्यासाठी,
निष्पाप सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी,मराठा बांधवांचे मनोबल उंचावण्यासाठी आणि
बीड जिल्ह्यातील गुंडगिरी व दहशत संपवण्यासाठी,२८ डिसेंबर २०२४ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक बीड येथून विराट मोर्चा काढला जाणार आहे.
सर्व जाती धर्मातील लोकांनी बीड येथे होणाऱ्या सर्वपक्षीय विराट मोर्चात लाखोंच्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन रेडेकर यांनी केले आहे.
0 टिप्पण्या