सातारा (प्रतिनिधी) सातारा जि.प.शिक्षण विभाग पंचायत समिती जावली (मेढा) व पवारवाडी येथील रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जावली (मेढा) तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात बिभवी येथील जि.प.प्रा.या शाळेतील इयत्ता ७ वी. मधील विद्यार्थी राज मोहन गुळंबे याच्या फ्युचर पब्लिक ट्रान्सपोटेशन या विज्ञान प्रयोगास तालुकास्तरीय तिसरे बक्षीस मिळाले. या प्रयोगाचे मार्गदर्शक राकेश बोडखे (सर) यांना बक्षीस वितरण करतांना जावली तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी मा.संजय धुमाळ,शिक्षण विस्तार अधिकारी कर्णे,शिक्षण विस्तार अधिकारी दळवी,भणंग केंद्राचे केंद्रप्रमुख मिलन मुळे व उपस्थित सर्व केंद्राचे केंद्रप्रमुख व इतर मान्यवर विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकाचे भणंग केंद्राचे केंद्रप्रमुख मिलन मुळे, मुख्याध्यापक अशोक लकडे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य सरपंच,उपसरपंच व सर्व ग्रा.पं.सदस्य व शाळेतील सर्व शिक्षक व समस्त ग्रामस्थ बिभवी यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा. दिल्रा.