Ticker

6/recent/ticker-posts

मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्यासह ना.पंकजाताई आणि ना.धनंजय मुंडे यांना राष्ट्रसंत वामनभाऊ पुण्यतिथी सोहळ्यास उपस्थित राहण्याचे महंत विठ्ठल महाराज यांचे निमंत्रण

आष्टी (प्रतिनिधी) सबंध महाराष्ट्र आणि देशाच्या कानाकोपऱ्यातील सर्वसामान्य भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या राष्ट्रसंत वामनभाऊ महाराज यांच्या श्रीक्षेत्र गहिनीनाथगडावरील ४९ व्या.पुण्यतिथी सोहळ्यास उपस्थित राहावे अशा प्रकारचे निमंत्रण गहिनाथगडाचे महंत विठ्ठल महाराज यांनी आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्यासह महाराष्ट्र राज्याचे नूतन कॅबिनेट मंत्री ना.पंकजाताई मुंडे आणि ना.धनंजय मुंडे यांना आग्रहपूर्वक देण्यात आले. यावेळी त्यांच्यासोबत माजी आ.भीमराव धोंडे,भाजपचे जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख,उत्तम बोडखे हे उपस्थित होते. संतश्रेष्ठ वामनभाऊ महाराज यांचा ४९ वा. पुण्यतिथी सोहळा २१ जानेवारी २०२५ रोजी पाटोदा तालुक्यातील चिंचोली नाथ येथील श्रीक्षेत्र गहिनीनाथगडावर संपन्न होत आहे. यादिवशी गहिनीनाथगडावर संपूर्ण महाराष्ट्र आणि देशाच्या काही भागातून राष्ट्रसंत वामनभाऊंचे भाविक भक्त आवर्जून राष्ट्रसंत वामनभाऊंच्या आशीर्वाद आणि दर्शनासाठी नतमस्तक होण्यासाठी येत असतात.भजन, कीर्तन,प्रवचन महाप्रसाद आदी सह विविध धार्मिक उपक्रमांची यावेळी असते.आरोग्य विभागाच्यावतीने मोफत आरोग्य निदान शिबिराचे हे आयोजन केलेले असते.भव्य यात्रेचे स्वरूप असून लाखो भाविक भक्तांची मांदियाळी यावेळी असते. राष्ट्रसंत वामनभाऊ महाराजांनी आयुष्यभर गोरगरीब,दीन,दलीत, दुबळ्या,अनाथ,अपंग,शेतकरी, शेतमजूर, वंचित घटकासह ऊसतोड कामगारांना अंधश्रद्धेपासून दूर राहून शिक्षणाची कास धरण्याचे आवाहन केले. समता, बंधुत्व,ऐक्य धर्मसहिष्णुता आदि मूल्यांचा त्यांनी गावोगावी जाऊन प्रचार व प्रसार केला.त्यामुळे समाजातील लाखो जणांनी त्यांच्या विचार कार्याचा बोध घेऊन शिक्षणामध्ये उच्च पदावर जाण्याचा सन्मान मिळवला भाऊंचे विचार आणि कार्य आधुनिक समाज रचनेचा पाया घालणारे आहेत.अशा या महान विभूतींच्या ४९ व्या.पुण्यतिथी सोहळ्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्यासह बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र आणि भाऊंचे भक्त तसेच नूतन राज्य मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्री ना, पंकजाताई मुंडे आणि ना.धनंजय मुंडे आदीसह काही मान्यवर नामदार महोदयांना गहिनीनाथगडाचे महंत विठ्ठल महाराज आणि माजी आमदार भीमराव धोंडे यांनी प्रत्यक्ष भेटून पत्रिका देत गडावर येण्याचे आग्रहपूर्वक निमंत्रण दिले.या निमंत्रणाचा त्यांनी स्वीकार करून येण्याचे मान्य केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या