
आष्टी (प्रतिनिधी)
'आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून कृतज्ञतेचा भाव जपावा हे
मूलतत्त्व अंगीकारत अत्यंत सर्वसामान्य परिस्थितीतून यशाचा मार्ग निवडत कठोर
परिश्रमात यश निर्माण करणारे व्यक्तिमत्व..आणि शिक्षण क्षेत्रामध्ये प्रमाणिक
कर्तुत्व जोपासणारे भास्करराव सानप गुरुजी आजच्या युवा पिढीसाठी आदर्श स्त्रोत
आहेत. आज त्यांच्या जीवन कार्याला ७५ वर्षे पूर्ण झाली त्याबद्दल त्यांच्या
कर्तुत्वाचा सन्मान आणि गौरव कार्यक्रम संपन्न झाला. पवित्र शिक्षण क्षेत्रामध्ये
ऋषी तुल्य व्यक्तिमत्व म्हणून तब्बल चार दशकभर सेवा केल्यानंतर आपल्या मुलांनाही
उच्च शिक्षण देऊन आदर्श प्रेरणास्थान निर्माण केलेले ज्येष्ठ गुरुवर्य भास्करराव
सानप गुरुजींच्या अमृत महोत्सवी अभिष्टचिंतन सोहळ्याचे रविवारी शेवगाव येथील स्वराज
मंगल कार्यालयात आयोजन केले होते.त्यांच्या कर्तृत्वाचा आळंदी येथील जोग आध्यात्मिक
संस्थांचे हरिभक्त परायण परमेश्वर शास्त्री महाराज यांच्यासह विविध क्षेत्रातील
मान्यवरांच्या हस्ते सपत्नीक गौरव करण्यात आला.ज्येष्ठ गुरुवर्य भास्कर सानप गुरुजी
हे बीड जिल्ह्याच्या पाटोदा तालुक्यातील खडकवाडी येथील मुळ रहिवासी असून
नोकरीनिमित्त अहिल्यानगर मधील शेवगाव येथे स्थायीक झाले. जिल्हा परिषदेच्या
शाळेमध्ये अनेकदा अनेक ग्रामीण भागातील वाड्या वस्त्या आणि तांड्यावर त्यांनी पायी
चालत जाऊन चिमुकल्या विद्यार्थ्यांमध्ये संस्कार रुजवण्याचे अत्यंत प्रमाणिकपणे आणि
तितक्याच अव्याहत आणि धाडसाने आवाहन स्वीकारत ते यशस्वीपणे पेलले.अविरत शिक्षण
क्षेत्रामध्ये विद्यार्थी घडवण्याचे त्यांनी कार्य केले. सेवानिवृत्ती नंतरही
त्यांनी शांत संयमी अभ्यासू स्वभावातून मार्गदर्शनाचे कार्य करत संस्कारक्षम दिशा
देण्याचे काम केले. मुलांनाही उच्च शिक्षण देऊन कायदा आणि शिक्षण क्षेत्रात उच्च
पदापर्यंत पोहोचवले.७५ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल भास्कर सानप गुरुजींच्या
वाढदिवसाच्या निमित्ताने अमृत महोत्सवी अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन रविवार दि.१५
डिसेंबर रोजी शेवगाव येथील स्वराज मंगल कार्यालयामध्ये संपन्न झाला.शेवगाव शहरासह
अहिल्यानगर आणि बीड जिल्ह्यातील विविध गुणी जणांनी अण्णांच्या कार्यकर्तुत्वावर
अभिनंदन अभिनंदनची थाप टाकत भविष्यातील निरोगी यशदायी जीवनासाठी शुभेच्छा व्यक्त
केल्या.सर्वांचे आभार डॉ.प्रा. प्रकाश सानप,ॲड.संजय सानप,सौ. रुक्मिणी आणि डॉ.
बाळासाहेब आघाव यांनी मानले. चौकट -------- प्रमाणिकपणा आणि संकटाचा धैर्याने सामना
ही जीवनमूल्य दिली! -------------------------------------------- 'मला भास्करराव
सानप गुरुजींचा मुलगा म्हणून अभिमान आहे.आई वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून त्यांनी
कृतज्ञतेचा भाव जोपासला.विद्यार्थ्यांच्या साठी त्यांनी पूर्ण आयुष्य समर्पित केले.
आम्हा कुटुंबियांमध्ये सुद्धा त्यांनी त्याग, कष्ट, प्रामाणिकपणा आणि संकटाचा
धैर्याने सामना करणे ही अमूल्य जीवनमूल्ये त्यांनी आमच्यात रूजली. त्यांनी दिलेले
संस्कार आमच्यासाठी सदैव दिशादर्शक आहेत.त्यांच्या गौरवाचा हा क्षण आमच्यासाठी
सुवर्णक्षण आहे!' ----ॲड.संजय सानप ( ज्येष्ठ विधीज्ञ)
----------------------------------------
0 टिप्पण्या