सातारा (प्रतिनिधी) पत्रकारिता व लेखनी क्षेत्रामध्ये तब्बल ३५ वर्षाहून अधिक कालावधी जनसामान्यांचे प्रश्न लेखणीच्या माध्यमातून सोडवण्यात आणि राजकीय, सामाजिक, धार्मिक,वैचारिक, शैक्षणिक क्षेत्रामध्ये महत्त्वाची भूमिका घेऊन सामाजिक बांधिलकी जपणारे ज्येष्ठ पत्रकार उत्तम बोडखे आणि त्यांच्या परिवाराने आज रविवारी सातारा जिल्ह्यातील श्री क्षेत्र पाल येथील खंडोबा देवस्थानचे मनोभावे दर्शन घेतले.महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. मनोभावे श्रद्धा ठेवून ईश्वराची पूजा केल्यानंतर समाधान आणि ऊर्जा मिळते ही येथील परंपरा आहे आणि याच पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्याच्या आष्टी येथील दैनिक झुंजारनेताचे उपसंपादक आणि वरिष्ठ पत्रकार लेखक उत्तम बोडखे सातारा जिल्ह्यातील पालच्या खंडोबा देवस्थान येथे कुटुंबीयांसह पोहोचले.त्या देवस्थानावर राज्यभरातून भाविक भक्त मोठ्या श्रद्धायुक्त भावनेने येतात.आज पोर्णिमेनिमित्त फार मोठी भक्तांची गर्दी दिसून आली.दरम्यान, बोडखे परिवारातील आदर्श शिक्षिका सौ.बबीता उत्तम बोडखे,राकेश बोडखे सर,सौ.अश्विनी राकेश बोडखे,चि. रियांश राकेश बोडखे (वय ३ वर्षे), श्रीमती अंजना धोंडे ,सौ.सविता अशोक धोंडे यांनी मनोभावे पाल देवस्थान मधील खंडोबाचे दर्शन घेतले. यावेळी फोटो घेत असताना खंडोबा समजला जाणारा पवित्र श्वान अलगद योगायोगाने फोटोमध्ये आल्याने एक वेगळी चर्चा या निमित्ताने झाली.प्रत्येक जीव हा या सृष्टीमध्ये महत्त्वाचा असून त्याचे रक्षण झाले पाहिजे त्या अनुषंगाने श्वान हा सुद्धा महत्त्वाचा पशु असून त्याचे संरक्षण आणि संवर्धन करण्याची गरज आहे.आज धार्मिक क्षेत्रामध्ये पूज्य समजला जाणाऱ्या पाल येथील पुजारी यांनी उत्तम बोडखे यांना येथील पवित्र प्रसाद देऊन भविष्यातील त्यांची लेखणी रंजल्या गांजल्या,दिनदलीत,दुबळ्या, अनाथ,अपंग,शेतकरी, शेतमजूर आणि वंचित घटकांसह ऊसतोड कामगारांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवण्यासाठी चालावी,यासाठी पाल येथील खंडोबा देवस्थानच्यावतीने आशिर्वाद दिले.