

आष्टी (प्रतिनिधी)
लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांची कन्या आणि महाराष्ट्राची रणरागिणी पंकजाताई मुंडे आणि ढाण्या वाघ म्हणून महाराष्ट्रात आपल्या प्रचंड भाषण कौशल्याने राजकीय क्षेत्रात क्षितिज गाठलेल्या धनंजय मुंडे या बहिण- भावांच्या एकाच मंचावर राज्यपालांनी दिलेल्या कॅबिनेट मंत्रिपदाच्या शपथेनंतर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील वाड्या वस्त्यांवर व गाव आणि शहरांमधून प्रचंड आनंदोत्सवाला उधान आले..
पेढे वाटून ढोलीबाजा आणि विविध गीतांमधून ग्रामीण भागातील मुंडे प्रेमींनी अक्षरशः नृत्याविष्कार करून आपल्या इच्छापूर्तीला मनसोक्त वाव दिला... दरम्यान, बीड जिल्ह्याच्या अकरा तालुक्यातील आनंदाश्रूंनी मुंडे प्रेमी जनता अक्षरशः नाव्हून निघाली...
रविवारी १६ डिसेंबर २०२४ रोजी राज्यमंत्री मंडळाच्या शपथेचा कार्यक्रम राज्याची उपराजधानी नागपूर येथे संध्याकाळी सहाच्या दरम्यान पार पडला.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते.यावेळी कॅबिनेट मंत्री म्हणून बीड जिल्ह्याच्या पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या बहिण भावांना मान मिळाला.ही शपथ ऐकताना बीड जिल्ह्यातील तमाम लाखो बांधवांनी डोळ्यात तेल घालून शब्द ऐकण्यात धन्यता मानली.या आनंदी बातमी नंतर बीड शहरासह आष्टी, पाटोदा,शिरूर माजलगाव आंबेजोगाई ,गेवराई ,परळी ,वडवणी, धारूर, माजलगाव, केज आदिसह वाड्या, वस्त्या आणि शहरासह ग्रामीण भागात ढोलीबाजासह आणि विविध गीतांवर हजारो कार्यकर्त्यांनी मनसोक्त नाचून आपल्या इच्छापूर्तीला वाव दिला.भावा बहिणींना कॅबिनेट मंत्री पद दिल्याने लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी आपल्या आयुष्यभर जनतेसाठी केलेल्या कार्याची फलश्रुती या निमित्ताने होत असून जिद्द,चिकाटी ,मेहनत आणि परिश्रमातून लोकनेते गोपीनाथ मुंडेंनी शिकवलेला तालमीतून घडलेले हे मल्लं भविष्यात बीड जिल्हा वासियांच्या आणि महाराष्ट्र वासियांची मनोभावे विकास रुपी सेवा करून लोकनेते मुंडेंचा जनसेवेचा वसा व वारसा पुढे ठेवतील हा विश्वास राजकीय जानकार आणि निरीक्षकांनी व्यक्त केला आहे.
चौकट
--------
जोड हाय वाघांची,अन नाही माग सरायची!' गीता'ला सोशल मीडियावर प्रचंड प्रतिसाद!
---------------------------------------------
मुंडे भावा- बहिणींच्या कर्तुत्वाला आपल्या गीतरचनेतून सादर करणाऱ्या ग्रामीण भागातील गायक कलावंतांच्या 'जोड हाय वाघांची, अन् नाही मागे सरायची!' या गीताला सोशल मीडियाच्या माध्यमातून कालपासून प्रचंड प्रतिसाद मिळाला.जनसेवेचा वारसा मुंडे घराण्याने जपला. झोपडीतल्या आणि दारिद्र्यात खितपत पडलेल्या माणसाच्या दुःखात सामील होऊन त्यावर फुंकर मारण्याची ताकद मुंडेंनी निर्माण केली.म्हणूनच
" लोकनेता " ही पदवी स्व. मुंडेंना जनतेने दिली. तेच प्रेम पुढे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी चालू ठेवून वसा आणि वारसा जपत असल्याचे या माध्यमातून स्पष्ट झाले आहे.
----------------------------------------
0 टिप्पण्या