Ticker

6/recent/ticker-posts

सराटेवडगांवचे माजी सरपंच पंढरीनाथ बोडखे यांचे निधन

आष्टी (प्रतिनिधी) आदर्शगाव आनंदवाडी - सराटेवडगाव येथील माजी सरपंच पंढरीनाथ सिताराम बोडखे (वय ९२) यांचे काल शुक्रवारी वृद्धापकाळाने निधन झाले.त्यांच्यापाठीमागे लक्ष्मणबुवा बोडखे , रामभाऊ बोडखे,ह.भ.प. सुखदेव महाराज बोडखे हे तीन भाऊ,बहिणी, शिवाजी बोडखे हा मुलगा,श्रीमती कांताबाई बोडखे ही पत्नी,सौ. सिंधुबाई अंकुश सायकड,सौ.गयाबाई महादेव खराडे,सौ. चांगुणाबाई बबन नन्नवरे मुली,सौ.छायाबाई गोरख शिंदे या चार मुली,सुन, नातवंडे असा मोठा परिवार आहे.अंत्यविधी शनिवारी झाला.यावेळी राजकीय, सामाजिक, धार्मिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.दिपक बोडखे, सरपंच भीमराव बोडखे यांचे ते आजोबा आहेत तर सराटेवडगांव विविध कार्यकरी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन बबन नन्नवरे यांचे ते सासरे होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या