Ticker

6/recent/ticker-posts

सराटेवडगांवचे माजी सरपंच पंढरीनाथ बोडखे यांचे निधन

आष्टी (प्रतिनिधी) आदर्शगाव आनंदवाडी - सराटेवडगाव येथील माजी सरपंच पंढरीनाथ सिताराम बोडखे (वय ९२) यांचे काल शुक्रवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यापाठीमागे लक्ष्मणबुवा बोडखे , रामभाऊ बोडखे,ह.भ.प.सुखदेव महाराज बोडखे हे तीन भाऊ,बहिणी, शिवाजी बोडखे हा मुलगा,श्रीमती कांताबाई बोडखे ही पत्नी,सौ.सिंधुबाई अंकुश सायकड,सौ.गयाबाई महादेव खराडे,सौ.चांगुणाबाई बबन नन्नवरे मुली,सौ.छायाबाई गोरख शिंदे या चार मुली,सुन,नातवंडे असा मोठा परिवार आहे. अंत्यविधीस ह.भ.प.निवृत्तीदादा बोडखे महाराज,प्रशासकिय अधिकारी माऊली बोडखे,इंजि.पी.बी बोडखे, सेवानिवृत्त पीएसआय अन्सार शेख, साईनाथ बोडखे,माजी सरपंच प्रा.डाॕ. राम बोडखे,माजी चेअरमन राजाराम नन्नवरे,संदीप सुंबरे,चेअरमन बबन नन्नवरे,व्हा.चेअरमन कोंडीभाऊ झांबरे, रंगनाथ बोडखे,प्रा.डाॕ.गोपीनाथ बोडखे, एस.पी.बोडखे सर,चेअरमन भानुदास बोडखे,अशोक सुंबरे,भाऊसाहेब शेळके, उपसरपंच पवन तरटे, भाऊ तरटे, तान्हाजी सुंबरे,राजपुरे सर,गोरख शिंदे, हनुमंत झगडे,मोहन झगडे, भाऊसाहेब खराडे,ज्ञानेश्वर सायकड सर,मेजर दत्ता घुसाळे,दादाभाऊ धाडगे, शरद दळवी राजकीय, सामाजिक, धार्मिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.दिपक बोडखे यांचे आजोबा आहेत. सराटेवडगांव विविध कार्यकरी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन बबन नन्नवरे यांचे ते सासरे तर सरपंच भीमराव बोडखे यांचे ते चुलते आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या