
आष्टी (प्रतिनिधी)
महाराष्ट्र राज्य भारत स्काऊटस् व गाईडस् मुंबईच्यावतीने राज्य प्रशिक्षण केंद्र छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय राज्य पुरस्कार स्काऊट चाचणी शिबिरास दि.२ डिसेंबर २०२४ रोजी प्रारंभ झाला आहे.हे शिबिर दि. ५ डिसेंबर २०२४ पर्यंत सुरु राहणार आहे महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट गाईड मुंबईच्या वतीने या शिबिराचे शिबिर प्रमुख जालना जिल्ह्याचे स्काऊट गाईड विभागाचे जिल्हा संघटक स्काऊट तथा लीडर ट्रेनर स्काऊट के.एल.पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.त्यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन झाले.
यावेळी शिबिर सहाय्यक म्हणून सहाय्यक शिबिर प्रमुख संतोष सोनवणे, जिल्हा संघटक स्काऊट छत्रपती संभाजीनगर, मिलिंद तायडे, जिल्हा संघटक स्काऊट परभणी, योगेश आवढाळ जिल्हा संघटक बीड, अनंत पाटील, ज्येष्ठ स्काऊट मास्टर तथा सहाय्यक लीडर ट्रेनर छत्रपती संभाजीनगर,जिल्हा संघटक गाईड श्रीमती प्रिया आधाने इत्यादींची उपस्थिती होती. या चार दिवसीय राज्यस्तरीय चाचणी शिबिरादरम्यान सहभागी सर्व स्काऊट विद्यार्थ्यांची स्काऊट गाईड त्रिवार्षिक अभ्यासक्रमावर आधारित लेखी, तोंडी, प्रात्यक्षिक स्वरूपात परीक्षा मोठ्या खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न होत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने स्काऊट गाईड चा इतिहास, राष्ट्रध्वज ,राष्ट्रगीत, स्काऊट गाईड प्रार्थना, नियम,वचन,ध्येय खून, हस्तांदोलन, बी पी व्यायाम प्रकार, योगा,स्काऊट गाईड ध्वजारोहण पद्धत होकायंत्र, स्वयंपाकाचे प्रात्यक्षिक,कम्युनिकेशन गेम, हाताच्या, सिटीच्या व मागाच्या खुणा, आग विझवण्याच्या पद्धती, विविध पायोनियरिंग प्रोजेक्ट, विविध प्रकारच्या गाठीचे प्रकार, बांधण्या, कॅम्प क्राफ्ट, गार्डन प्रोजेक्ट, विविध प्रकारचे कलागुणांना वाव देण्यासाठी प्राविण्य पदक अभ्यासक्रम, निसर्गात तंबू सजावट व निरीक्षण इत्यादी बाबीचा समावेश आहे. स्काऊट गाईड अभ्यासक्रमाच्या माध्यमातून सहभागी विद्यार्थ्यांचे कला गुण विकसित होतात. विविध संकटावर मात करून प्रसंगानुसार जीवन जगण्याची कला विकसित होते, आनंददायी जीवन जगण्याची भावना विकसित होते, सर्वधर्मसमभाव, शिस्त चारित्र्यसंवर्धन आरोग्य संवर्धन स्वावलंबन व सेवा या बाबीचे देखील शिक्षण या माध्यमातून मिळते या चाचणी परीक्षेत पात्र विद्यार्थ्यांना महाराष्ट्राचे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल महोदय यांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र देखील प्राप्त होते. हा सन्मान स्काऊट गाईड विद्यार्थ्यांचा विद्यार्थी जीवनातील सर्वात मोठा सन्मान असल्यामुळे सहभागी सर्व स्काऊट गाईडचे विद्यार्थी या परीक्षेत सहभागी होऊन मोठ्या उत्साहाने ही परीक्षा देत असल्याची भावना शिबिर प्रमुख के एल पवार यांनी व्यक्त केली.
या राज्यस्तरीय राज्य पुरस्कार चाचणी शिबिरास छत्रपती संभाजी नगर विभागातील बीड जिल्ह्यातील २० स्काऊट, जालना जिल्ह्यातील ४१ स्काऊट, छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील २४ स्काऊट, परभणी जिल्ह्यातील ९ स्काऊट, हिंगोली हिंगोली जिल्ह्यातील १४ स्काऊट तसेच अमरावती विभागातील बुलढाणा जिल्ह्यातील ३३ स्काऊट असे एकूण १४० स्काऊट विद्यार्थ्यांची या शिबिरास उपस्थिती आहे.या राज्यस्तरीय राज्य पुरस्कार चाचणी शिबिरात जिल्हा परिषद माध्यमिक शाळा आष्टा ह.ना.. या शाळेचे ४ स्काऊट, जिल्हा प.माध्यमिक शाळा चौसाळा या शाळेचे ७, स्काऊट ,द.बा.घुमरे पब्लिक स्कूल गेवराईचे २ स्काऊट, सिंदफणा पब्लिक स्कूल माजलगावचे २ व विद्यावर्धीणी विधालय परळीचे ५ असे एकूण २० स्काऊट विद्यार्थी या शिबिरासाठी बीड जिल्ह्यातून जिल्हा संघटक योगेश आवढाळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थित आहेत.हे शिबिर यशस्वी करण्यासाठी स्काऊट स्काऊट मास्टर संतोष शिंगणे,पंढरीनाथ कोळी,मिलिंद बगाटे, विठ्ठल पुरी, संग्राम तोगरे, पंडित सूर्यवंशी,पुरुषोत्तम सोळंके, गजानन चव्हाण, शफिक अहमद, बापू शिंदे, सतीशकुमार पडूळकर, आनंद वाघमारे, रवींद्र देवरे, शिवाजी गायकवाड,दिलीप गंगातिवरे सर, ज्ञानेश्वर बेले सर, शहादेव गाडगे, रामेश्वर नालमवार, वसिमोद्दीन काझी, प्रशांतकुमार हरकळ, बाबाराव डोईजड, गजानन घुगे,शिवाजी गायकवाड,सिद्धेश्वर मस्के,राजकुमार कोल्हे, रवींद्र देवरे, निलेश राठोड, अनंत पाटील, किरण सरुळे, श्रीमती छाया शिवाजी वाघदरे इत्यादी २९ स्काऊट मास्टर विविध समितीच्या माध्यमातून सेवा देऊन हे शिबिर यशस्वी करण्यासाठी महत्वपूर्ण सहकार्य करी आहे. स्काऊट गाईडचे कार्यालयीन कर्मचारी विजय घुसिंगे, विनोद बारोटे, श्रीमती ज्योत्स्ना पिंपरीकर, हारचंद जारवाल, दीपमाला मोरे आदि सहकार्य अथक परिश्रम परिश्रम घेत आहे.
0 टिप्पण्या