

आष्टी ( प्रतिनिधी )
आष्टी विधानसभा मतदार संघाचे तीन वेळा सलग आणि
मध्यंतरी,धाराशिव- लातूर - बीड स्थानिक प्राधिकारी मतदार संघातून विधानपरिषद सदस्य
आणि २०२४ च्या विधान सभा निवडणूकीत विक्रमी मताधिक्य मिळवत चौथ्या वेळी विधानसभा
सदस्य असे एकूण पाच वेळेस आमदार झालेले विकासाभिमुख नेतृत्व आ.सुरेश धस यांनी
जामगाव या गावचे सरपंच पदापासून आपल्या राजकीय प्रवासाचा श्री गणेशा केला.जिल्हा
परिषद सदस्य, जिल्हा परिषदेचे दोन वर्षे उपाध्यक्ष,आष्टी तालुका दुध संघाचे चेअरमन
,महानंद डेअरीचे संचालक, आमदार ,राज्यमंत्री, विधानमंडळ अनुसूचित जमाती कल्याण
समितीचे अध्यक्ष,श्री दत्त शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष या विविध पदांवर त्यांनी
उल्लेखनीय काम केले आहे.आष्टी विधानसभा मतदार संघातील विकासाचा पाईक म्हणून ओळखले
जाणारे आ.सुरेश धस यांनी आपल्या राजकीय प्रवासात अनेक महत्वपूर्ण कामगिरी बजावलेली
आहे. त्यांच्या सततच्या जनसंपर्क आणि सेवेमुळे मतदार संघाचा सर्वांगीण विकास झाला
आहे.सुरेश धस यांनी आष्टी विधानसभा मतदार संघात सिंचन, वीज, दळणवळण, शिक्षण आणि
औद्योगिक विकासावर भर दिला.शेतकऱ्यांसाठी सिंचन योजना, गावोगावात वीज
पुरवठा,राष्ट्रीय महामार्गांशी जोडणी आणि पाटोदा,शिरूर येथील विकासाच्या महत्वाच्या
कामगिरीचे तसेच तीन ही तालुक्यातील अनेक देवस्थानांसाठी निधी आणून भाविक भक्तांची
सोय केली आहे असे उदाहरणे आहेत. या विकास कामांमुळे मतदार संघातील बेरोजगार
तरुणांना रोजगाराच्या संधी मिळाल्या आहेत. स्वर्गीय रामचंद्र धसदादा यांच्या
मार्गदर्शनाखाली राजकीय कार्यात सक्रिय झालेले आ.सुरेश धस हे जातीय भेदभाव न करता
सर्वजाती- धर्मातील लोकांना एकत्र घेऊन चालणारे समावेशक नेतृत्व म्हणून ओळखले
जाते.त्यामुळे ते चार वेळा आष्टी विधानसभा मतदार संघाचे आमदार झालेले असून सहा
वर्षे बीड,लातुर धाराशिव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातुन विधान परिषद सदस्य
राहिलेले आहेत.त्यांची लोकप्रियता अफाट आहे.आता मतदार संघातील जनता त्यांना
मंत्रीपद मिळावे अशी मागणी आ.सुरेश धस यांचे कट्टर समर्थक कडा कृषी उत्पन्न बाजार
समितीचे संचालक तथा क-हेवडगावचे सरपंच परिवंत गायकवाड यांनी केली आहे. आ.सुरेश धस
हे लढवय्या नेतृत्व आहे. मातीसाठी आणि अठरा पगड जातीसाठी हा नेता कायम कोणत्याही
परिस्थितीला न डगमगता कायम धाडसी निर्णय घेत आलेला आहे.बीड जिल्ह्यातल्या राजकारणात
त्यांनी अनेकवेळा उलथापालथ केलेली आहे.जे आहे ते रोखठोक बोलण्याची आणि करण्याची धमक
स्वर्गीय रामचंद्र धस दादाच्या या कर्तुत्ववान आणि धाडशी मुलामध्ये आहे.आ.सुरेश धस
हे मराठा समाजाचे रांगडं व धाडसी नेतृत्व आहे. ते छुपा डाव खेळत नाहीत आणि खेळूही
देत नाही.तसाच प्रकार या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या बाबत होताना दिसला.तो डाव
जनतेनी उधळून लावला. निवडणुकीत झालेला प्रकार विजयी सभेत त्यांनी बोलून दाखवला.
अनेक लोकांना ते झोंबले मात्र ते लोक आ.सुरेश धस यांचे पारंपारिक विरोधक आहेत.वाचाळ
बडबड करणाऱ्या विरोधकाला महत्व द्यायचं नसतं अशा वाचाळ वीरांना आ. सुरेश धस समर्थक
उत्तर देताना दिसत आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप महायुतीने
दैदीप्यमान असे यश मिळविले आष्टी,पाटोदा, शिरूर विधानसभा मतदार संघातून माजी मंत्री
सुरेश धस यांनी ८० हजारांच्या फरकाने मोठा विजय संपादन केला आहे.आ.सुरेश धस यांनी
यापूर्वी तीन वेळा विधानसभेचे नेतृत्व आणि एक वेळा लातूर - बीड - धाराशिव या
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदार संघातून विधान परिषदेमध्ये सुद्धा काम केले आहे.
त्यांच्याजवळ आमदारकीच्या चार टर्मचा दांडगा अनुभव आहे. त्यांचा जनसंपर्क सुद्धा
खूप मोठा आहे. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी महसूल व पुनर्वसन सह अनेक खात्याचे
राज्य मंत्रीपद सुद्धा भूषविले आहे. त्यांनी मंत्रिपदाच्या काळात अतिशय उत्तम असे
काम केलेले आहे. याच दरम्यान उत्तराखंडमध्ये आलेली पूर परिस्थिती असो की मतदार
संघात पडलेला दुष्काळ असो आ.धस यांनी आपल्या कौशल्याचा वापर करून ही परिस्थिती
उत्तमपणे हाताळली होती. मराठवाड्यातील ऊसतोड कामगारांचे प्रश्न असो की पाणी प्रश्न
हा अत्यंत जिव्हाळ्याचा असलेला प्रश्न सुद्धा त्यांनी वेळोवेळी पोटतिडकेने सभागृहात
मांडलेला आहे. विशेष म्हणजे कोरोनाच्या महामारीच्या काळात महाराष्ट्रात सर्वात
जास्त कोविड सेंटर आ.धस यांनी चालविले आणि त्यातून हजारो लोकांना या महाभयंकर
संकटातून वाचविले होते. आ.सुरेश धस यांची ग्रामीण भागातील जनतेशी अतिशय घट्ट अशी
नाळ जुळली आहे हे कालच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून सिद्ध
होते.मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रश्नांचा त्यांना अत्यंत बारकाईने
अभ्यास आहे. हे आपण वेळोवेळी त्यांच्या सभागृहातील भाषणांमधून पाहिलेच आहे म्हणून
भारतीय जनता पार्टीने आ.धस यांच्या अनुभवाचा योग्य तो सन्मान करून राज्य
मंत्रिमंडळत त्यांना कॕबीनेट मंत्री म्हणुन स्थान द्यावे.या निवडीचा फायदा आष्टी
विधानसभा मतदार संघासह संपूर्ण मराठवाड्यासह आणि महाराष्ट्रालासुद्धा होईल.
त्यामुळे भारतीय जनता पार्टीने जनसामान्यांच्या मताचा आदर करीत त्यांना मंत्री
करावे आणि बीड जिल्ह्याच्या विकासासाठी काम करण्याची संधी द्यावी. अशी मागणी
त्यांचे कट्टर समर्थक कडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा क-हेवडगावचे सरपंच
परिवंत गायकवाड यांनी केली आहे.
0 टिप्पण्या