
आष्टी (प्रतिनिधी)
देशासह राज्यात थंडीची सुरूवातीला सुरू आहेत. बुधवारपासून थंडीचा
कडाका वाढल्याने आष्टी शहरात जागोजागी शकोट्या पेटल्या आहेत. आष्टी शहरातील पारा १०
अंशावर आला आहे.बीड जिल्ह्यात आणखी काही दिवस थंडीचा मुक्काम राहणार असल्याचे
तज्ज्ञाचे मत आहे.बीड जिल्ह्यात रब्बी हंगाम सुरू आहे.यंदा चांगला पाऊस झाल्याने
गहू,हरभरा, मका, कांदा आदी पिके जोमात आहेत. थंडीचा पिकांना लाभ होणार आहे.
जानेवारीचे दोन आठवडे थंडीचा जोर राहाणार असल्याची शक्यता आहे. ढगाळ हवामानामुळे
काही प्रमाणात थंडी गायब झाली होती. बुधवारपासून पुन्हा थंडीचा जोर वाढला
आहे.बुधवारी आष्टीचे तापमान ११.५ अंश सेल्सिअस के होते.रविवारी मात्र पारा खाली आला
असून १०.९ इतका नोंद झाली.त्यामुळे आष्टी शहरात जागोजागी शेकोट्या पेटल्याचे चित्र
होते. बाजारपेठेत मध्ये काम करणारे कामगार व भाजीविक्रीचा व्यवसाय करणारे, माॕर्नीग
वाॕकचे मेंबर हे थंडीपासून संरक्षण करण्यासाठी उबदार कपड्यांचा वापर करताना
दिसले.थंडी वाढल्याने उबदार कपड्यांची मागणी वाढली आहे. वातावरण बदलताच मुलांना
सामान्यतः विषाणूजन्य ताप,सर्दी- खोकला,संसर्ग आणि इतर संसर्गाचा त्रास होऊ लागतो.
दिवाळीनंतर थंडी वाढत असल्याने बालके व लहान मुलांना ताप,सर्दी- खोकल्याचा त्रास
वाढल्याचे दिसून येत आहे.दरम्यान, मुलामुलींच्या आरोग्याच्या तक्रारी वाढल्या आहेत
पालकांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे.थंडीच्या दिवसात लहान मुलांना घराबाहेर जास्त काळ
फिरायला घेऊन जाणे टाळा. बाहेरील वातावरण लहान मुलांच्या आरोग्यासोबत समतोल राखू न
शकल्यास ते आजारी पडू शकतात. झोपेच्या वेळेस त्यांच्या अंगावर जड पांघरुण टाकू
नका.त्यापेक्षा सुती किंवा ब्लँकेटचा वापर करा तर थंडीत लहान मुलांचा काळजी
घेण्यासाठी खासकरून त्यांची खोली कशी उबदार राहील याकडे जास्त लक्ष द्या.उबदार
वातावरणासाठी तुम्ही हिटर्सचा वापर करु शकता पण हिटर्स वापरताना त्याचा संपर्क लहान
मुलांशी येणार नाही याची काळजी अधिक घ्या. चौकट ---------- थंडीत लहान मुलांना काय
धोका? -------------------------------- सर्दी,खोकला,ताप,श्वास घ्यायला त्रास
होणे,ब्रोंकाइटिस असे प्रकार आढळतात.ताप,खोकला,उलटी, जुलाब,पोटदुखी,अंगदुखी अशी
लक्षणे आढळतात.जलद श्वास घेणे,छातीत घरघर येणे इत्यादी देखील मुलांमध्ये
न्यूमोनियाची लक्षणे असू शकतात. यामध्ये बहुतेक पाच वर्षांखालील मुलांना श्वास
घेण्यास त्रास होतो.या सगळ्याचा थंडीत लहान मुलांना धोका असतो.मुलांना सर्दी
खोकल्याचा त्रास अधिक हिवाळा हा ऋतू आरोग्यासाठी चांगला असला तरी वाढत्या थंडीच्या
सुरुवातीला लहान बालकांना एकाचवेळी बदलले वातावरण सूट होत नाही.परिणामी सर्दी
खोकल्याचा त्रास अधिकच वाढतो. त्यामुळे बालकांच्या आरोग्याचा विचार करता तातडीने
वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. ------डॉ.नितीन घोडके ( बालरोग तज्ज्ञ कडा)
------------------- चौकट ------------ रोगराईला निमंत्रण
------------------------- थंडी वाढल्याने आजारांचे प्रमाणही वाढले आहे.शहरातील
हॉस्पिटलमध्ये सर्दी,खोकला,ताप अशा संसर्गजन्य आजाराचे प्रमाण वाढले आहे.त्यामध्ये
लहान मुलांचे सर्वाधिक प्रमाण आहे. खासगी रुग्णालयासह शासकीय रुग्णालयात तपासणीसाठी
व उपचार घेण्यासाठी येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.त्यामुळे उबदार
कपडे वापरावेत. ---- पी.बी.बोडखे. ************************
0 टिप्पण्या