Ticker

6/recent/ticker-posts

गोपीनाथ प्रतिष्ठानचा भीमराव धोंडे यांना जाहीर पाठिंबा

आष्टी (प्रतिनिधी) लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या घराण्यासी एकनिष्ठ असलेले तसेच शांत संयमी असलेले लोकनेत्या पंकजाताई मुंडे, यांच्या पाठीशी कायम सावलीप्रमाणे उभे राहणारे आष्टी पाटोदा शिरूर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार माजी आमदार भीमराव धोंडे यांना सुरुवातीपासून ते शेवटच्या टप्प्यापर्यंत मतदार संघात युवकांचा आणि मतदारांचा पाठिंबा वाढत आहे. मतदानाच्या अगोदर दोन दिवस आष्टी तालुक्यातील जय गोपीनाथ प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संघटनेचा जाहीर पाठिंबा देण्यात आला. युवकांनी माजी आमदार भीमराव धोंडे यांना जाहीर पाठिंबा दिला. त्यामुळे भीमराव धोंडे आणि युवा नेते अजयदादा धोंडे हे या निवडणुकीत युवकांची फळी बांधण्यात यशस्वी झाल्याची चर्चा मतदारसंघात आहे. आष्टी तालुक्यातील जय गोपीनाथ प्रतिष्ठानच्या वतीने सुभाष आंधळे व त्यांचे सहकारी यांनी अपक्ष उमेदवार भीमराव धोंडे यांना पाठिंबा देऊन त्यांच्याकडे प्रवेश केला या यावेळी बोलताना सुभाष आंधळे यांनी सांगितले की आष्टी पाटोदा शिरूर तालुक्यातून अपक्ष उमेदवार भीमराव धोंडे यांना जास्तीत जास्त मताधिक्य देऊ. त्यांचा विजय निश्चित आहे. फक्त आमचा वाटा, विजयी मताधिक्याचा असणार आहे असा विश्वास जय गोपीनाथ प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. विकासाची दुरदृष्टी असलेले माजी आमदार भीमराव धोंडे यांचा विजय कोणीही रोखू शकत नाही. अशी प्रतिक्रिया याप्रसंगी जय गोपीनाथ प्रतिष्ठानचे सुभाष आंधळे, बबन बारगजे, हनुमंत विघ्णे, संग्राम केंद्रे ,आनंद ठोंबरे, भुजंग खेडकर, मोहन केदार, संदीप सानप, विनोद खेडकर, नागेश वनवे, मनिष वनवे यांनी मत व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या