सुरेश धस,भीमराव धोंडे, बाळासाहेब आजबे महेबुब शेख यांचे भवितव्य मतपेटीत बंद *********************** मतदानानंतर आष्टी शहरात राडा... पाच मिनिटांत बाजारपेठ बंद ....... ७२ टक्के मतदान शांततेत
आष्टी (प्रतिनिधी)
महाराष्ट्र राज्याची विधानसभा निवडणूकनिमित्त दि.२० नोव्हेंबर
रोजी सर्वत्र निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली.आष्टी विधानसभा मतदार संघात नव
मतदारांसह एकूण ७२ टक्के मतदारांनी मतदानाचा सहभाग घेतला.यामुळे माजी आ.सुरेश धस,
माजी आ.भीमराव धोंडे,आ. बाळासाहेब आजबे व महेबुब शेख यांच्यासह १३ उमेदवारांचे
भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. दि.२० नोव्हेंबर रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६
वाजेपर्यंत आष्टी विधानसभा मतदार संघात मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. आष्टी
विधानसभा मतदार संघात ४४० मतदान केंद्र निर्माण करण्यात आले होते.यामध्ये एकूण ३
लाख ८६ हजार मतदानापैकी सुमारे २ लाख ८३ हजार मतदारांनी मतदान केले आहे.आष्टी
विधानसभेच्या सभेसाठी दिवसभरात ७२ टक्के मतदान झाले.आता येत्या शनिवारी म्हणजे २३
नोव्हेंबर रोजी मतमोजणी होऊन आष्टी मतदार संघाचा आमदार कारभारी कोण होणार? हे
स्पष्ट होईल.आष्टी मतदार संघात एकूण ३ लाख ८६ हजार ३५८ पैकी २ लाख ८१ हजार ८८७
जणांनी बजावला मतदानाचा हक्क सरासरी ७२ टक्के मतदान झाले.यामध्ये पुरूष - २०५३५६
पैकी १५१८२१ तर स्त्री- १८१००१ पैकी १४००६६ मतदारांनी हक्क बजावला आहे.आष्टी
शहर,आष्टी तालुक्यातील बीडसांगवी,पोखरी, गणगेवाडी, वाळुंजआदि मतदान केंद्रावर
शाब्दीक चकमकी,वादविवाद झाले.पोलीस यंत्रणा डिसाळ होती, जनतेने पोलीसांना सांगीतले
तरी ते पोलीसांची संख्या कमी असल्याचे सांगुन टाळाटाळकरीत होते.आष्टी शहरातील
जुन्या पाण्याच्या टाकीजवळ चार मुस्लीम युवकांवर अज्ञात तरुणांनी राजकारणातुन हल्ला
झाला.हजारो मुस्लिम बांधव पोलीस ठाण्यात जाऊन बसले. व उशीरापर्यत फिर्याद देण्याचे
काम सुरु होते. आष्टी शहरातील हल्ल्यानंतर दोन्ही उमेदवार हजर
------------------------------- आष्टी शहरातील हल्ल्यानंतर दोन्ही उमेदवार हजर
तातडीने राष्ट्रवादी काँगेस महाविकास आघाडीचे उमेदवार शेख महेबुब, माजी आ.भीमराव
धोंडे, नियामत बेग,सतीषआबा शिंदे,राम खाडे,अमोल तरटे,आण्णासाहेब चौधरी, लालाभाऊ
कुमकर रत्नदीप निकाळजे, डाॕ.नदीम शेख,ॲड.रिजवान शेख,शेख अज्जुभाई आदि मान्यवर
उपस्थित होते. आष्टी शहर वगळता विधानसभा मतदार संघात एकूणच शांततेत मतदान
झाले.आष्टीचा अपवाद वगळता कुठल्याही प्रकारचा अनुचित झाल्याची माहिती नाही.निवडणूक
निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी वसीमा शेख,सहाय्यक निवडणुक अधिकारी तथा
तहसिलदार वैशाली पाटील व त्यांचे सहकारी अधिकारी यांनी निवडणूक प्रक्रिया शांततेत
पार पाडण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले.२० नोव्हेंबरला १७ मतदारांचे भवितव्य
मतपेटीत बंदिस्त झाले असले तरी कोणता उमेदवार निवडून येणार याबद्दल तर्कवितर्क सुरू
झाले आहेत.दि.२३ नोव्हेंबरला शासकीय आयटीआय येथे मतमोजणी होणार आहे.निकालाची
उत्सुकता सर्वत्र आहे.दरम्यान मतदारांमध्ये पैजा लागल्या आहेत.
0 टिप्पण्या