Ticker

6/recent/ticker-posts

नांदुरचे सुपुत्र नाशीक येथील युवा उद्योजक प्रशांत विधाते यांचे निधन

आष्टी (प्रतिनिधी) आष्टी तालुक्यातील नांदुर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदीर ट्रस्टचे अध्यक्ष एकनाथ बलभीमराव विधाते यांचे सुपुत्र नाशीकचे ओपल वायनरी कंपनीचे संचालक युवा उद्योजक प्रशांत एकनाथ विधाते (वय ३८) यांचे अल्पशा आजाराने पुणे येथे उपचार घेताना निधन झाले.अत्यंत कमी वयात प्रशांत विधाते या तरुणाचे निधन झाल्याने नांदुर परिसवर शोककळा पसरली होती.अंत्यविधी नांदुर विठ्ठलाचे येथे सकाळी १० वा.मेहकरी नदीकाठी झाली.प्रशांत विधाते यांच्या पाठीमागे पत्नी तेजस्वीनी विधाते,कृष्णाली (वय ८ वर्षे) व स्निथी (वय ३ वर्षे ) विधाते या दोन मुली,आई सौ.कल्पना एकनाथ विधाते व वडील एकनाथ विधाते, बहिण सौ.प्रतिभा विजय बोरुडे (पुणे),नामदेव विधाते व परशुराम विधाते हे चुलते असा मोठा परिवार आहे.युवा उद्योजक प्रशांत विधाते यांनी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण अहमदनगर येथील रेसिडेन्शिअल हायस्कूल, बीएस्सी (वाईन टेक्नॉलॉजी) नाशिक येथे पूर्ण करून त्यानंतर सहा वर्ष हेरिटेज वायनरी बेंगलोर येथे वाईन मेकर म्हणून काम केले.त्यानंतर सोमा वाईन व्हिलेज नाशिक येथे प्रकल्प व्यवस्थापक म्हणून काम केले. त्यानंतर स्वतःची ओपल वायनरी प्रा.लि. या नावाने स्वताःची कंपनी सुरु केली होती.नांदूरसारख्या ग्रामीण भागातून आलेला एक उमदा तरुण नाशिकसारख्या शहरी भागामध्ये आपली स्वतःची कंपनी सुरु करतो निश्चितच त्याच्या कार्य नोंद घेण्यासारखेच आहे.असा हा कर्तबगार उद्योजक होता.अंत्यविधीस ह.भ.प.नामदेव शास्त्री,माजी आ.साहेबराव दरेकर,अभय धोंडे,राजेंद्र धोंडे,नाशीकचे सोमा वायनरीचे संचालक ओंकार प्रदीप पाचपाटील, शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे,धर्मराज शिंदे,प्रा. बाळासाहेब धोंडे,अनिल गायकवाड ,विजय झगडे सर,सरपंच संजय विधाते,उपसरपंच विलास गवळी,माजी सरपंच आदिनाथ विधाते, प्रा. नवनाथ जाधव,ह.भ.प.विठ्ठलराव गुंड,पत्रकार उत्तम बोडखे,दिगांबर जोगदंड,उपप्राचार्य संजय धोंडे,श्रीधर कन्हेरकर,सतीष बोडखे सर,शब्बीर पठाण,दादा राऊत आदि राजकीय, सामाजिक धार्मिक,शैक्षणिक ,उद्योग क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. दशक्रियाविधी बुधवार दि.२७ नोव्हेंबर रोजी सकाळी नांदुर येथे होणार आहे. विशेष म्हणजे दि. ३० नोव्हेंबर रोजी प्रशांतचा ३९ वा.वाढदिवस होता दुदैवाने वाढदिवसा दिवशी तेरावा विधी आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या