Ticker

6/recent/ticker-posts

कडा येथे सकाळी भावाची तर दुपारी बहिणीची प्रचार सभा

आष्टी ( प्रतिनिधी ) आष्टी विधानसभा मतदार संघातील प्रचाराची सांगता कडा येथे दोन वेगवेगळ्या सभांनी होणार आहे. विधानसभा निवडणुकीचा प्रचार सोमवारी समाप्त होत आहे.कडा येथे सकाळी १० वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची आ. बाळासाहेब आजबे यांच्या प्रचारार्थ भागीरथी पार्क केरूळ या ठिकाणी सभा होणार आहे तर आ. पंकजाताई मुंडे यांची माजी आ. सुरेश धस यांच्या प्रचारार्थ कडा येथील मोतीलाल कोठारी विद्यालयाच्या मैदानात दुपारी १२ वाजता सभा होणार आहे.याआधी शुक्रवारी संध्याकाळी खा. सुप्रिया सुळे ,खा.निलेश लंके आणि खा. बजरंग सोनवणे यांची महेबुब शेख यांच्या प्रचार प्रचारार्थ सभा झाली होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या