Ticker

6/recent/ticker-posts

युवा नेते आणि मतदार संघाचे युथ आयडॉल बनलेले डाॕ.अजयदादा धोंडे यांनी मतदार संघ पिंजून काढला

आष्टी,पाटोदा,शिरूर विधानसभा मतदार संघाचे अपक्ष उमेदवार माजी आ.भीमराव धोंडे यांच्या प्रचारार्थ युवा नेते आणि मतदार संघाचे युथ आयडॉल बनलेले डाॕ.अजयदादा धोंडे यांनी मतदार संघ पिंजून काढला आहे.त्यांनी यापुर्वीच युवाशक्तीचे संघटन केल्यामुळे ते आज युवकांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत.प्रत्येक गावात गेल्यानंतर ग्रामस्थांकडून त्यांचे जोरदार स्वागत होत आहे.याबाबत अधिक माहिती अशी की,मराठवाड्यातील सर्वात मोठा विधानसभा मतदारसंघ म्हणजे आष्टी विधानसभा मतदारसंघ आहे आणि बीड जिल्ह्यात सर्वाधिक मतदार संख्या असलेला मतदारसंघ म्हणून आष्टी मतदार संघाची ओळख आहे.विधानसभा निवडणुकीच्या काळात उमेदवारांना प्रत्येक गावापर्यंत जाणं म्हणजे खूप कसरत करावी लागते परंतु या मतदार संघाचे भाग्यविधाते माजी आ.भीमराव धोंडे यांनी यापूर्वीच तीन महिन्यापासून सुरू केलेल्या दौऱ्यामुळे त्यांनी ४०० च्यावर गावेवाड्यांवर,वस्त्यांना भेटी देऊन दौरा पूर्ण केला आहे.आता निवडणुकीच्या काळातही गाठीभेटी मेळावे,सभा सुरु आहेत आणि त्यांचे चिरंजीव युवाशक्तीची मोट बांधण्यात यशस्वी झालेले अजयदादा धोंडे यांनी सध्या मतदारसंघ पिंजून काढला आहे. अनेक गावात जाहीर सभा घेत आहेत.त्यामुळे युवाशक्ती प्रचंड संख्येने त्यांच्या पाठीमागे उभा राहिली आहे.त्यामुळे दौऱ्याला गेल्यानंतर त्यांच्यासोबत फक्त " शिट्टी " आणि शिट्टीचाच आवाज घुमत आहे त्यामुळे या निवडणुकीत अपक्ष उमेदवार माजी आ. भीमराव धोंडे यांचा विजय निश्चित आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या