Ticker

6/recent/ticker-posts

आष्टी मतदार संघात गावागावात धोंडेंच्या "शिट्टी " चा आवाज ........... माजी सभापती सुवर्णाताई लांबरुड

आष्टी (प्रतिनिधी) एक आदर्श राजकारणी म्हणून माजी आ.भीमराव धोंडे यांची ख्याती आहे. बोलण्यापेक्षा कृतीतून सर्वसामान्यांसाठी काहीतरी करण्याची त्यांची सातत्याने तळमळ सर्वश्रुत आहे. आष्टीसारख्या ग्रामीण भागात कृषी,शैक्षणिक तसेच आरोग्य महाविद्यालय उभारून त्यांनी विकास काय असतो त्यांनी कृतीतून दाखवले आहे.अशा अत्यंत माजी आमदाराच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय मतदार बांधवांनी घेतल्याचे दिसून येत आहेत.प्रचाराची सांगता होताना गावोगावी माजी आ.भीमराव धोंडे यांच्या " शिट्टी " चा आवाज घुमताना दिसत असल्याचे प्रतिपादन पाटोदा पंचायत समितीच्या सभापती सौ.सुवर्णाताई लांबरुड यांनी केले. माजी आ.भीमराव धोंडे यांच्या विजयाची खात्री असल्याचे भाकीत सभापती सौ.लांबरुड यांनी पत्रकारांशी बोलताना केले. सभापती सौ.लांबरुड म्हणाल्या की,अपक्ष उमेदवार असलेले धोंडे यांना सर्वत्र मोठा प्रतिसाद मिळत आहे. आष्टी,पाटोदा,शिरूर विधानसभा मतदार संघाची महाराष्ट्रात चर्चा होऊ लागली आहे. मातब्बर नेत्यांत अत्यंत अटीतटीची फाईट होणार आहे असे चित्र असले तरी अनपेक्षित निकाल लागण्याची दाट शक्यता आहे. तब्बल चार टर्म अत्यंत चांगले, विकसात्मक व रचनात्मक काम केलेल्या माजी आमदार भीमराव धोंडे यांना अपक्ष लढण्याची वेळ आली.भीमराव धोंडेंना विजयाची माळ घालण्यासाठी खुद्द मतदार संघातील मतदार बांधवच पुढे सरसावले आहेत.आष्टी, पाटोदा,शिरूर तालुक्यात अपक्ष उमेदवार भीमराव धोंडे यांच्या " शिट्टी " चा आवाज घुमताना दिसतोय.आष्टी मतदार संघात गावागावात धोंडेंच्या " शिट्टी " चा आवाज आहे.आष्टी,पाटोदा तालुक्यातील बहुसंख्य गावात अजयदादा व अभयराजे यांचा प्रचाराचा झंझावात झाला.आष्टी, पाटोदा,शिरूर विधानसभा मतदार संघातील सर्व मतदार हे आमदारकीचे उमेदवार आहेत असे समजून प्रत्येकाने आपल्या गावागावी सतर्क राहुन व्यवस्थित मतदान करुन घ्यावे.मतदारांना " शिट्टी " या चिन्हसमोरील बटन दाबून मोठ्या मताधिक्याने भीमराव धोंडे साहेब यांना निवडून आणण्याचे आवाहन देखील माजी सभापती सौ.सुवर्णाताई लांबरुड यांनी केले.धोंडे कुंटुंबाकडुन कोणावरही अन्याय झाला नाही आणि होणार नाही. आमच्या कार्यकर्त्यांवर अन्याय झाला तर तो दूर करण्यासाठी धावून जातात. धोंडेसाहेब यांचा साधा सरळ स्वभाव त्यांच्या विजयासाठी महत्त्वाचा ठरणार आहे असे सभापती लांबरुड यांनी ठिकठिकाणी प्रचारात सांगीतले आहे. आपल्याला ही निवडणूक अत्यंत बहुदुरीने जिंकावी लागणार आहे.ही निवडणूक तशी सोपी नाही मात्र निवडणूक जनतेने हातात घेतली आहे.त्यामुळे भीमराव धोंडेसाहेब यांचा विजय निश्चित होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या