Ticker

6/recent/ticker-posts

मातकुळी येथील श्रीकृष्ण विद्यालयाच्या संघाची मुंबई येथे होणाऱ्या मल्लखांब राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

,
आष्टी (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक संचालनालय मुंबई,महाराष्ट्र शासन व विभागीय कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांच्यावतीने आज धर्मवीर संभाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सावरकरनगर सिडको एन ५ छत्रपती संभाजीनगर येथे संपन्न झालेल्या विभागीय मल्लखांब शालेय क्रीडा स्पर्धेत आष्टी तालुक्यातील मातकुळी येथील श्रीकृष्ण विद्यालयाचा १७ वर्षाखाली मुलांच्या संघाची २८ नोव्हेंबर रोजी मुंबई येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. संभाजीनगर विभागातून सुमित रंधवे हा सर्वप्रथम क्रमांकाने विजयी झाला. तर मुलींमधून कु. ज्ञानेश्वरी धनवे ही विभागातून सर्वप्रथम आली.त्याचप्रमाणे पवन डोके व नैतिक डोके हे अनुक्रमे द्वितीय क्रमांकाने राज्य स्पर्धेसाठी निवड झाली. विकास जरे या खेळाडूचे ही विभागीय स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी केल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.सर्व विजयी खेळाडूंचे शाळेचे क्रीडाशिक्षक अशोक डोके सर,मल्लखांब मुख्य प्रशिक्षक बबलू टेकाळे वस्ताद,प्रशिक्षक अमोलदादा निमोणकर, राजू दादा भांबे,निलेश गोड टेलर,सागर डोके, , यांनी परिश्रम घेतले.या विजयी खेळांडुचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आ. भीमराव धोंडे,प्रशासन अधिकारी डाॕ.डी.बी. राऊत,प्रा.शिवदास विधाते,माऊली बोडखे, संजय शेंडे,शाळेचे मुख्याध्यापक गोरक्षनाथ सरकाळे,शाळेतील सर्व शिक्षक,शिक्षिकांनी अभिनंदन करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या