
आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी,पाटोदा,शिरूर विधानसभा मतदार संघाची महाराष्ट्रात चर्चा होऊ लागल्या आहे. मातब्बर नेते अत्यंत अटीतटीने प्रचाराला लागले असून तब्बल चार टर्म अत्यंत चांगले काम केलेल्या माजी आमदार भीमराव धोंडे यांना अपक्ष लढण्याची वेळ आल्याने त्यांना विजयाची माळ घालण्यासाठी खुद्द मतदार संघातील मतदार बांधवच पुढे सरसावले आहेत.आष्टी,पाटोदा,शिरूर तालुक्यात अपक्ष उमेदवार भीमराव धोंडे यांच्या सिटीचा आवाज घुमताना दिसत आहे.
आष्टी तालुक्यातील लोणी जिल्हा परिषद गटातील प्रचार शुभारंभाच्या नारळ लोणी येथे सय्यदमीरबाबा या दर्ग्याला चादर चढून नारळ अर्पण करुन,पिंपळा येथील पिंपळेश्वर महाराज येथे नारळ फोडून दर्गा शरीफचे दर्शन, साहेब महाराज यांना नारळ फोडला.या प्रचाराला सुरुवात झाली.युवा नेते डाॕ.अजयदादा धोंडे बोलताना म्हणाले की,आष्टी,पाटोदा,शिरूर विधानसभा मतदार संघातील सर्व मतदार हे आमदारकीचे उमेदवार आहेत असे समजून प्रत्येकाने आपल्या गावागावी व्यवस्थित मतदान करण्यासाठी फेऱ्या काढाव्यात जनजागृती करावी व " शिट्टी " या चिन्हसमोरील बटन दाबून मोठ्या मताधिक्याने भीमराव धोंडेसाहेब यांना निवडून आणावे असे आवाहन युवा नेते डाॕ.अजयदादा धोंडे यांनी केले.
पिंपळा लोणी जिल्हा परिषद गटामधील आयोजित प्रचार शुभारंभ दौऱ्यामध्ये ते बोलत होते.कोणावरही अन्याय झाला तरी आम्ही त्यांच्यावर अन्याय दूर करण्यासाठी धावून जाऊ मात्र त्यांच्यासाठी आपल्याला हे निवडणूक अत्यंत बहुदुरीने लढावी लागणार आहे असे डाॕ.अजयदादा धोंडे म्हणाले.ही निवडणूक तशी सोपी नाही मात्र निवडणूक जनतेने हातात घेतली आहे.त्यामुळे भीमराव धोंडेसाहेब यांचा विजय निश्चित होणार आहे असे युवराज खटके बोलताना म्हणाले की, पिंपळा, लोणी जिल्हा परिषद गटाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमिर सय्यद होते.यावेळी पिंपळा, लोणी जिल्हा परिषद गटामधील आयोजित प्रचार यामध्ये असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी उपस्थित युवा मल्हार सेना महाराष्ट्र राज्य प्रदेश कार्याध्यक्ष युवराज खटके,पं.स. चे माजी सदस्य संजय धायगुडे,प्रा.दादा विधाते,माजी सरपंच चंद्रशेखर साके,उपसरपंच रामदास देवकर,माजी सरपंच बाजीराव वाळके, छबूराव देवकर,भैरनाथ खांदवे, बेल्हकर सिताराम,शरद रकटाटे,लक्ष्मण कराळे, बेल्हेकर संतोष,गणेश पोकळे, शिंदे बबनराव,नारायण निकम,शिंदे राजेंद्र, अशोक सावरे,शिंदे भगवान,चंद्रकात सावरे,दिलिप रक्टाटे,गणेश वाळके, शेनश्वर चांदगुडे,राजेद्र वाकळे,थोरात सर,सचिन शिंदे,विठ्ठल खटके,दिगंबर मेहेत्रे,राजेंद्र गावडे,संभाजी शिंदे,जनार्धन भवर आदी पिंपळा लोणी जिल्हा परिषद गटातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एक आदर्श राजकारणी म्हणून माजु आ.भीमराव धोंडे यांची ख्याती आहे.बोलण्यापेक्षा कृतीतून सर्वसामान्यांसाठी काहीतरी करण्याची त्यांची सातत्याने तळमळ सर्वश्रुत आहे आष्टीसारख्या ग्रामीण भागात कृषी,शैक्षणिक तसेच आरोग्य महाविद्यालय उभारून त्यांनी विकास काय असतो त्यांनी कृतीतून दाखवले आहे.अशा अत्यंत माजी आमदाराच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय मतदार बांधवांनी घेतल्याचे दिसून येत आहेत.दरम्यान प्रचाराला सुरुवात होतानाच गावोगावी माजी आ. भीमराव धोंडे यांच्या " शिट्टी " चा आवाज घुमताना दिसत आहे. सर्वत्र मोठ्या प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
0 टिप्पण्या