आष्टी ( प्रतिनिधी) महाविकास आघाडीचे आष्टी विधानसभा मतदार संघातील अधिकृत उमेदवार महेबुब शेख यांच्या प्रचारार्थ आज शनिवार दि.९ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता आष्टी येथील ईदगाह मैदान येथे माजी केंद्रीय मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांची जाहीर विरिट प्रचार सभा होणार आहे.या सभेस मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन राष्ट्रवादी पार्टीचे (शरदचंद्र पवार गट) जेष्ठ नेते आण्णासाहेब चौधरी यांच्यासह तालुकाध्यक्ष परमेश्वर शेळके, पाटोदा तालुकाध्यक्ष शिवभूषण जाधव, शिरूर तालुकाध्यक्ष दिपक खोले यांनी केले आहे. आष्टी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार महेबुब शेख यांनी आष्टी विधानसभा मतदार संघ पिंजून काढला आहे. सर्वसामान्य नागरिकांचा त्यांना मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत आहे. ही विधानसभा निवडणूक जनतेने हातात घेतली असल्याने महेबुब शेख यांचा विजय निश्चित झाला आहे. त्यांच्या प्रचारार्थ माजी केंद्रीय कृषिमंत्री तथा राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांची आष्टी येथे शनिवारी दुपारी २ वाजता जाहीर सभा होणार आहे.आष्टी विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कष्टकरी, युवक तसेच कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन जेष्ठ नेते आण्णासाहेब चौधरी यांनी केले आहे.