
आष्टी (प्रतिनिधी)
लोकशाहीच्या उत्सवात लोकांना महत्त्वाचे स्थान असते. किंबहुना भारत जगाच्या विविध देशांच्या श्रंखलेत एक बलशाली लोकशाही राष्ट्र म्हणून पुढे आलेले आहे.पाच वर्षांनी हा उत्सव देशभर होत असतो त्या उत्सवात वृत्तपत्रांच्या लेखणीला महत्त्वाचे स्थान आहे.वृत्तपत्र या क्षेत्रात बुद्धिवंतांच्या समतोल लेखणीला महत्त्वाचे स्थान असते आजपर्यंत देश आणि जगामध्ये क्रांती ही बुद्धिमत्तांच्या लेखणीतून निर्माण झालेली आहे हे वास्तव आहे आणि म्हणूनच जनसामान्यांच्या प्रश्नाला वाचा फोडत समतावादी राष्ट्रनिर्माण करण्यात याच बुद्धिवंतांची भूमिका निर्विवाद राहिलेली आहे.महाराष्ट्राच्या मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात गेल्या ३६ वर्षाहून अधिक काळ निरंतर वृत्तपत्र क्षेत्रात स्वतःला पूर्णपणे वाहून घेतलेल्या उपसंपादक तथा ज्येष्ठ पत्रकार उत्तम बोडखे यांच्या ३२ वर्षांपूर्वीच्या एका विभागीय दैनिकाच्या संपादकांनी केलेल्या सत्काराच्या फोटोने गोड आठवणींचा हूंदका निर्माण झाला आहे.३२ वर्षांपूर्वी उत्तम बोडखे हे एका विभागीय दैनिकात आष्टी प्रतिनिधी म्हणून काम करत होते. गोरगरीब,दिनदलीत, दुबळ्या, अनाथ, अपंग, शेतकरी,शेतमजूर वंचित,घटक कामगारांच्या जीवनात क्रांती व्हावी या व्यापक हेतूने आपल्या लेखणीला बळ देताना त्यांनी सातत्याने प्रश्न मांडले आणि याची दखल घेत तत्कालीन संपादकांनी उपराजधानी नागपूर येथे उत्तम बोडखे यांचा भव्य कार्यक्रमात यथोचित सन्मान केला होता.या सन्मानाने उत्तम बोडखे यांची छाती आणखीनच भरून आली आणि त्यांनी आपले ज्ञानाच्या लेखणीच्या जोरावर आणि बळावर उत्तम पायाभरणी करत यशोशिखर गाठले.आज उत्तम बोडखे बीड जिल्ह्यातील लोकप्रिय दैनिक झुंजारनेताचे उपसंपादक या पदावर कार्यरत आहेत.त्यांचे एक साप्ताहिक असून ३० वा. दिवाळी अंक प्रकाशीत झलेला आहे. त्यांचा कित्येक वर्षाचा अत्यंत गोड प्रवास आहे.निवडणुकीवर भाष्य करताना त्यांची लेखणी अत्यंत समतोल, दूरदृष्टी आणि योग्य दिशेने जात असल्याचा कित्येक वर्षाचा अनुभव आहे आणि म्हणूनच आजपर्यंत त्यांनी वर्तवलेले अंदाज वास्तवात आलेले आहेत.आज विधान सभेची निवडणूक सर्वत्र प्रचाराच्या धामधुमीत पुढे जात आहे याच वेळी पत्रकार उत्तम बोडखे यांचा ३२ वर्षांपूर्वी झालेला संपादकांच्या हस्ते गौरव हा फोटो पाहताना त्यांनी तीन दशकापूर्वी केलेली पायाभरणी आज खऱ्या अर्थाने भव्य इमारतीत साकार झालेली आहे. त्यांची लेखणी भविष्यात ५० वी.गाठावी आणि जनसामान्यांचे प्रश्न शासन दरबारी असेच ठेवत ठेवावेत.. या अपेक्षेसह त्यांना खूप शुभेच्छा..!
0 टिप्पण्या